शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या लाटेत पोलीस दलाची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत रस्त्यावर बंदोबस्त करणारे पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये बाधितांचे प्रमाण मोठ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत रस्त्यावर बंदोबस्त करणारे पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये बाधितांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. त्यात ५५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांना एकतर सुट्टी दिलेली अथवा कार्यालयात काम देण्यात आल्याने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्यांची संख्या अतिशय कमी झाली होती. अशा वेळी विशेष पोलीस अधिकाऱ्यांची तात्पुरती नेमणूक करुन पहिल्या लाटेच्या वेळी पुणे पोलिसांनी वेळ निभावून नेली होती. आता मात्र, दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीलाच योग्य काळजी, टेस्टिंग, ट्रेसिंग आणि तत्काळ ट्रीटमेंट या तीन गोष्टींवर भर देण्यात आला. त्यामुळे दुसर्‍या लाटेत कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण पोलीस दलात मर्यादित आहे.

पहिल्या लाटेच्या वेळी अनेक पोलीस ठाणे, पोलीस चौक्यांमधील जवळपास सर्व जण क्वारंटाईनमध्ये गेल्याचे प्रसंग घडले होते. मार्चमध्ये दुसर्‍या लाटेला सुरुवात झाली. तोपर्यंत दररोज २ -३ पोलिसांना लागण होत होती. काही दिवसात ती संख्या १० ते १५ पर्यंत वाढली. हे लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संसर्ग रोखण्यासाठी एक पथक तयार केले. पोलीस आयुक्तालय, मुख्यालय व पोलीस ठाण्यांमधील सर्वांच्या चाचण्या करुन घेतल्या. लक्षणे नसलेले परंतु बाधित असल्याचे आढळून आलेल्यांचे तातडीने विलगीकरण केले गेले. त्याचबरोबर लसीकरणावर भर देण्यात आला. त्यातून पोलीस दलात दुसर्‍या लाटेतील बाधितांची संख्या मर्यादित राहिली आहे.

पहिली लाट दुसरी लाट

एकूण पोलीस रूग्ण - १७३० ३५०

एकूण पोलीस मृत्यू - ११ ७

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषधे

पोलिसांमधील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वेगवेगळी आयुर्वेदिक औषधांचा सर्व पोलीस ठाणेस्तरावर पुरवठा करण्यात आला. त्याचबरोबर प्रत्येक पोलीस ठाण्यात नेमण्यात आलेल्या वेलनेस ऑफिसरमार्फत आरोग्यविषयक सूचना सातत्याने पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यापर्यंत पोहचविण्यात आल्या. त्याचबरोबर पोलीस दलातील लसीकरणाचा नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्यात आला. त्यामुळे जवळपास ९० टक्के पोलिसांचे लसीकरण करण्यात आले आहे.

सुविधांवर भर

पोलीस तसेच त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली तर त्यांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी पोलीस रुग्णालयात ऑक्सिजन बेडसह सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या. फ्रँटलाईन वर्करसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा १० टक्के कोटा राखून ठेवण्यासाठी शासनाला आदेश काढण्यास प्रतिबंध केले.

.....

मास्क, सुरक्षित अंतर यावर भर

पहिल्या लाटेत मला व कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर लसीकरण केले. दुसर्‍या लाटेत मास्क आणि सुरक्षित अंतर पाळणे, प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर दिला आहे. पोलीस आयुक्तालयातून सांगण्यात येणार्‍या सूचनाचे तंतोतंत पालन करण्याचा कटाक्ष असतो.

पोलीस अधिकारी

.......

टेस्टिंग, ट्रेसिंग आणि तत्काळ उपचार या तीन बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर पोलीस व त्यांच्या कुटुंबियांना उपचारासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध होतील याकडे लक्ष दिले. लसीकरणावरही भर दिल्याने दुसर्‍या लाटेत पोलीस दलातील संसर्ग कमी होण्यास मदत झाली आहे.

अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर