शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियाच्या जाचाचा दुसरा बळी

By admin | Updated: April 25, 2015 05:04 IST

दौैंड तालुक्यात उंडवडी येथे वाळूमाफियांनी मारहाण केल्याने एका युवकाने आत्महत्या केल्याला आठवडा होतो, तोच याच गावातील आणखी एका तरुणाने

राहू : दौैंड तालुक्यात उंडवडी येथे वाळूमाफियांनी मारहाण केल्याने एका युवकाने आत्महत्या केल्याला आठवडा होतो, तोच याच गावातील आणखी एका तरुणाने वाळूमाफियांच्या जाचातून गुरुवारी (दि. २३) आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, आत्महत्या केलेले दोघेही चुलतभाऊ होते. या प्रकरणी चार वाळूमाफियांवर यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दत्तात्रय भोंगळे (वय ३३) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून, यापूर्वी नीलेश भोंगळे याने आत्महत्या केली होती. दत्तात्रय यांच्या मृतदेहावर अंत्यविधी करण्याचा गुपचूप प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी स्मशानभूमीतून मृतदेह ताब्यात घेतला. दत्तात्रय भोंगळे यांच्या कुटुंबीयांतील रवींद्र भोंगळे यांनी तशी फिर्याद दाखल केली आहे.यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नं. १0८/१५ नुसार भा.दं. वि.क. ३०६, ३४ अन्वये उमेश सोनवणे, रामाभाऊ सोनवणे (दोघेही रा. राहू, ता. दौंड), भाऊ चौधरी (रा. नायगावपेठ) यांसह अन्य एक व्यक्ती (नाव समजू शकले नाही) या चार वाळूमाफियांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृत दत्तात्रय भोंगळे यांची पत्नी स्वाती यांनी केली आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी, वाळूवाहतुकीसाठी भोंगळे यांनी रस्ता दिला होता. यापोटी रकमेची मागणी करण्यासाठी नीलेश भोंगळे १६ एप्रिल रोजी गेला असता त्याला त्यांनी बेदम मारहाण केली. तेव्हा नीलेशने विषप्राशन करून आत्महत्या केली. हे प्रकरण आर्थिक तडजोड आणि राजकीय दबावापोटी मिटविण्यात माफियांना यश आले असल्याची जोरदार चर्चा होती. परंतु, हे प्रकरण न मिटविता दोषी वाळूमाफियांवर कारवाई करण्याची मागणी नीलेश भोंगळे याचा चुलतभाऊ दत्तात्रय भोंगळे यांनी केली होती. आपल्या भावाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यावंर कारवाईसाठी तो धडपडत होता. दत्तात्रय भोंगळे यालाही वाळूमाफियांकडून दमदाटी करण्याचा प्रकार घडत होता, असे परिसरात बोलले जायचे. त्यानुसार त्यामुळे त्याने कंटाळून उंडवडी येथे आत्महत्या केली. ही आत्महत्या दत्तात्रय याने स्वत: केली की त्याला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडले, हा प्रश्न गुलदस्तात आहे. (वार्ताहर)