शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

१२ जुलैपासून होणार द्वितीय सत्राच्या परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:08 IST

पुणे : द्वितीय सत्राची परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने (एमसीक्यू) घेण्यात येणार आहे. १२ जुलैपासून ही परीक्षा होणार असल्याचे सावित्रीबाई फुले ...

पुणे : द्वितीय सत्राची परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने (एमसीक्यू) घेण्यात येणार आहे. १२ जुलैपासून ही परीक्षा होणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट केले. याबाबत मंगळवारी वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.

परीक्षा वेळेत सुरू होणार आहे. तसेच, महिनाभरात निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले. परीक्षा विभागाने पहिल्या टप्प्यात अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तसेच, सर्व पदविका अभ्यासक्रमाचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे. त्यानंतर पदवी व पदव्युत्तरच्या अन्य वर्षातील अभ्यासक्रमाचे वेळापत्रक दोन दिवसांत प्रसिद्ध होईल. त्यानुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेची तयारी करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनामुळे संगणक, लॅपटॉप, मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांना सोयीच्या ठिकाणाहून परीक्षा देण्याची मुभा आहे. या परीक्षा सकाळी ९ ते ११, दुपारी १२ ते २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत होतील. एका सत्रात एकाच वेळी सुमारे ३० हजार विद्यार्थी परीक्षा देतील. या दृष्टीने परीक्षेचे नियोजन केले आहे. प्रॉक्‍टर्ड पद्धतीनुसार या परीक्षा होतील. त्यामुळे गैरप्रकार करणाऱ्यांवर करडी नजर राहणार आहे. तसेच, यंदा प्राध्यापकांनी प्रश्‍नसंचाची संख्या वाढवून दिली आहे.

विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट द्यावी

द्वितीय सत्राची परीक्षा सुरू होण्यापूर्वी सराव परीक्षा घेतली जाणार आहे. सराव परीक्षा ९ ते १० जुलै रोजी घेण्यात येणार आहे. ऑनलाइन परीक्षेची माहिती होण्यासाठी सर्वसाधारण प्रश्‍नांवर आधारित सराव परीक्षा होतील.

----

स्टुडंट प्रोफाइल करावी अपडेट

ऑनलाइन परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी व शंकांचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी sps.unipune.ac.in येथे लॉग ईन करून तक्रार नोंदवावी. तक्रार योग्य पद्धतीचे असणे आवश्‍यक आहे. तसेच ऑनलाइन परीक्षा योग्य पद्धतीने होण्यासाठी स्टुडंट प्रोफाइलमध्ये विद्यार्थ्यांनी स्वत:चा इ-मेल आयडी, मोबाईल क्रमांक अपडेट करावेत.

कोट

परीक्षा विभागाने द्वितीय सत्राच्या परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. १५ ऑगस्टपर्यंत या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करणार आहे. त्यामुळे परदेशात अथवा अन्य संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांना अडचण येणार नाहीत.

- महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ