शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
2
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
3
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
4
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
5
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी?
7
रशियाच्या निशाण्यावर नक्की कोण? रहिवासी भागात डागले ड्रोन, पण झेलेन्स्कींशी आहे थेट कनेक्शन!
8
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
9
मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल
10
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
11
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
12
खळबळजनक! ७ वर्षांच्या मुलाने चुकून घेतला ९ वर्षांच्या भावाचा जीव, खेळता खेळता काय घडलं?
13
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
14
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
15
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
16
वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा
17
येणं आनंदाचं, जाणं आशीर्वादाचं! गणराया, तू जाताना वेड लावून जातोस रे...
18
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसला जान्हवीचा बॉयफ्रेंड, गुलालाने माखला शिखर पहारीयाचा चेहरा, म्हणतो...
19
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
20
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले

स्मार्ट सिटी दुसरा टप्पा आजपासून

By admin | Updated: October 6, 2015 04:57 IST

स्मार्ट पुणे कसे असावे, याबाबत नागरिकांकडून सूचना, संकल्पना जाणून घेतल्या जात आहेत, याचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता महापालिकेच्या वतीने

पुणे : स्मार्ट पुणे कसे असावे, याबाबत नागरिकांकडून सूचना, संकल्पना जाणून घेतल्या जात आहेत, याचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता महापालिकेच्या वतीने दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नागरिकांनी सर्वाधिक महत्त्वाचे प्रश्न म्हणून निवडलेल्या विषयांवर दुसऱ्या टप्प्यांमध्ये अधिक तपशिलामध्ये मते नोंदविण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. तसेच यामध्ये सर्वाधिक सहभाग नोंदविणाऱ्या पुणेकरांवर महापालिकेकडून बक्षिसांची खैरात केली जाणार आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तयार करताना नागरिकांच्या सूचना महापालिकेकडून जाणून घेतल्या जात आहेत. पालिकेने राबविलेल्या पहिल्या टप्प्यामध्ये ३ लाख ७ हजार कुटुंबांनी सहभाग घेऊन अर्ज भरून दिले आहेत. त्यानुसार नागरिकांचा प्राधान्यक्रम महापालिकेकडून निश्चित करण्यात आला आहे. ’’वाहतूक आणि दळणवळण, पाणी व मलनि:सारण, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण व शाश्वत उपाय, सावधानता व सुरक्षा, ऊर्जा व वीजपुरवठा हे प्रमुख ६ विषय निवडण्यात आले आहेत. यासंबंधी प्रश्न सोडविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यावर पुणेकरांना त्यांची मते व्यक्त करण्याची संधी दुसऱ्या टप्प्यात देण्यात आली आहे. ही संधी १२ आॅक्टोबर २०१५ पर्यंत पुणेकरांना उपलब्ध असणार आहे, असे कुमार यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यामध्ये सहभागी होण्यासाठी ‘पुणे स्मार्टसिटी’ या पालिकेच्या संकेतस्थळावर आॅनलाइन फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामध्ये ६ विषय दर्शविण्यात आले असून, त्यावर क्लिक करून तपशिलामध्ये मते व्यक्त करता येणार आहेत. ज्यांना आॅनलाइन पद्धतीने सहभाग घेण्यास अडचणी आहेत त्यांच्यासाठी महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व पालिकेचे कर्मचारी टॅब घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरणार आहेत. त्यांच्या मदतीने नागरिकांना मते नोंदविता येणार आहेत. बस स्टँड, रेल्वे स्थानक यांसह सोसायटी, वस्त्यांमध्ये ते फिरणार आहेत.स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, याकरिता महापालिकेच्या वतीने पुणेकरांना बक्षिसे दिली जाणार आहेत. स्वत:चे नाव रजिस्टर करून आॅनलाइन पद्धतीने मत व्यक्त केल्यानंतर पुणेकरांना विशिष्ट पॉइंट व एक कोड नंबर मिळणार आहे. त्यानंतर त्यांनी इतरांना याची माहिती देऊन त्यांना आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास सांगायचे आहे. त्या वेळी त्यांना देण्यात आलेला कोड नंबर टाकून संबंधितांनी अर्ज भरायचा. प्रत्येक अर्जाच्या संख्येनुसार त्या पॉइंटमध्ये वाढ होत जाणार आहे. - कुणाल कुमार, आयुक्त