शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे, पिंंपरीतून सर्चलाईट मदतकार्य

By admin | Updated: July 31, 2014 02:34 IST

सायंकाळी अंधार पडल्यावर मदतकार्यात अडचणी येत होत्या. मात्र, सभामंडपात एक तरुण जीवंत सापडल्यानंतर रात्रीही मदतकार्य सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला

पुणे : सायंकाळी अंधार पडल्यावर मदतकार्यात अडचणी येत होत्या. मात्र, सभामंडपात एक तरुण जीवंत सापडल्यानंतर रात्रीही मदतकार्य सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला. त्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून सर्चलाईट मागविण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. रात्री उशिरा हे सर्चलाईट घटनास्थळी पोहोचले. जिल्हाधिकारी राव यांच्यासोबत पोलीस अधीक्षक मनोज लोहिया आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. अडिवरे गावात बुब्रा नदीकाठी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांचा अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. मृतदेह अडिवरे येथील आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले आहेत. माळीण गावातील एक शिक्षक मच्छिंद्र झांजरे, पत्नी, दोन मुले आणि आई- वडीलांसह येथे राहतात. आज सकाळी पदवीधर आॅनलाईनची परीक्षा असल्याने ते सकाळी आठ वाजता गावाबाहेर पडले होते. बोरघर येथे पोहोचल्यावर त्यांना घटनेची माहिती समजली. ते गावात गेले. परंतु, घरातील सर्व जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने बेपत्ता आढळले. रेशनकार्डवर नावे शोधताना सापडले मृतदेहही.. मदतकार्य करत असलेल्या भीमा गवारी यांना एका घरात रेशनकार्ड सापडले. त्यावरील नावे पाहत असतानाच खोदाई करत असताना नावे असलेले सर्व सहाच्या सहा मृतदेह सापडले. या प्रलयामध्ये घरामधील कोणीही वाचले नव्हते. यामध्ये पाच प्रौढ आणि एक बालिकेचा समावेश आहे.मदतपथकाला सापडलेल्या मृतदेहांची अवस्था पाहून त्यांना क्षणाचीही उसंत मिळाली नाही, हे स्पष्ट झाले. एक महिला बाळाला कुशीत घेऊन झोपलेल्या अवस्थेतच सापडली. तर एक महिलेचा मृतदेह आंघोळीच्या कपड्यावरच सापडला. डिंभे धरणाच्या पाण्याच्या दबावामुळे या परिसरातील डोंगरावर भेगा पडल्या आहेत. काही वर्षांपासून माळीण गावाजवळच्या डोंगराला भेग पडलेली आहे. काही किलोमीटर लांब असलेल्या या भेगेत वर्षानुवर्षे पाणी साठत आहे. त्यामुळेच डोंगर खचला असण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पांचाळे, कुशिरे, बेंडारवाडी, मेघोली गावाच्या वरच्या बाजुला असलेल्या डोंगरालाही अशाप्रकारची भेग असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. (वार्ताहर)