शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

वैज्ञानिक दृष्टीकोनाचा देशात आजही अभाव

By admin | Updated: November 11, 2015 01:45 IST

भारतातील संशोधनाची स्थिती दयनीय आहे. परदेशातून आलेल्या तंत्रज्ञानावर देश अवलंबून आहे. राष्ट्रीय प्रयोगशाळांचे काम निराशाजनक आहे.

पुणे : भारतातील संशोधनाची स्थिती दयनीय आहे. परदेशातून आलेल्या तंत्रज्ञानावर देश अवलंबून आहे. राष्ट्रीय प्रयोगशाळांचे काम निराशाजनक आहे. जग खूप प्रगत झालेले असताना आपल्याकडे आजही वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव असून त्याबाबत अशिक्षितता पहायला मिळते, अशी खंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विचारवंत दत्तप्रसाद दाभोळकर यांनी व्यक्त केली.अच्युत गोेडबोले आणि दीपा देशमुख लिखित ‘जग बदलणारे १२ जिनियस’ या पुस्तिकांच्या संचाचे प्रकाशन दाभोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात लेखक आणि चित्रकार अनिल अवचट उपस्थित होते. या प्रसंगी ‘मनोविकास’ प्रकाशनचे अरंविद पाटकरही उपस्थित होते. दाभोळकर म्हणाले, देश विज्ञानयुगात नेण्याचे विवेकानंदांचे स्वप्न होते. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सध्याच्या सैरभैर झालेल्या पिढीला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ते म्हणाले, आपल्याकडे मुर्तीला भातुकलीचे स्वरूप दिले जाते. असे करुन आपण देवाला छोटे करत आहोत. आपल्या आजूबाजूला विज्ञानाची अनेक साधने उपलब्ध असताना ती वापरण्याची प्रगल्भता आपल्याकडे नाही. हे चित्र बदलण्याच्या दृष्टीने विज्ञानाचा दृष्टीकोन अधिकाधिक व्यापक व्हायला हवा. विज्ञान हे वरदान आहे. त्यातील मूलनिरपेक्षता, कोरडेपणा नष्ट होऊन निरिक्षण पध्दती विकसित केल्यास विज्ञानाची गोडी निर्माण होईल. (प्रतिनिधी)