शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

शिष्यवृत्ती घोटाळा तंत्रशिक्षणच्या रडारवर

By admin | Updated: September 20, 2015 00:39 IST

ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिष्यवृत्ती वाटपाबाबत अनियमितता किंवा घोटाळा झाल्याचे आढळून आले, अशा शैक्षणिक संस्थांची तीन वर्षांची माहिती राज्य तंत्रशिक्षण विभागाने

पुणे : ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिष्यवृत्ती वाटपाबाबत अनियमितता किंवा घोटाळा झाल्याचे आढळून आले, अशा शैक्षणिक संस्थांची तीन वर्षांची माहिती राज्य तंत्रशिक्षण विभागाने सर्व विभागीय कार्यालयांकडून मागवली आहे.गेल्या काही काळांत समोर आलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर संचालनालयाकडून ही माहिती मागविण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने शिष्यवृत्तीमध्ये घोटाळा झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यातच काही शैक्षणिक संस्था आपल्या स्तरावर प्रवेशाचे प्रकारही दिसतात. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या विभागीय कार्यालयामार्फतच सर्व शिष्यवृत्तीबाबतची कार्यवाही सुरू असल्यामुळे अशा संस्था माहीत असतील, तर त्या संस्थांची माहिती राज्य संचालनालयाकडे पाठविण्याचे आदेश तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सुभाष महाजन यांनी दिले. संचालनालयाकडून गेल्या ३ वर्षांची माहिती मागविली आहे. त्यामध्ये एससी व एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी पात्र विद्यार्थी संख्या, त्यापैकी शिफारस केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, प्रतिवर्षी प्रतिविद्यार्थी महाविद्यालयाचे शुल्क, परीक्षा शुल्क, शिष्यवृत्ती, त्या संस्थेविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असेल, तर त्याबाबतची माहिती, तसेच अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांमधील किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली, कोणाला मिळाली नाही, त्याची कारणे आदींबाबतच्या माहितीचा समावेश आहे. (प्रतिनिधी)मागील काही वर्षांत शिष्यवृत्तीबाबतच्या तक्रारी वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत होत्या. ते समाजकल्याणशी संबंधित होते, तरीही आम्हीदेखील आमच्या पातळीवर काही शिष्यवृत्तीबाबत माहिती मागविली आहे. संस्थास्तरावर प्रवेश दिल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. - डॉ. सुभाष महाजन, संचालक, राज्य तंत्रशिक्षण संचालनालय