शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई अनुदानवाटपातही दिरंगाई!

By admin | Updated: April 20, 2016 00:55 IST

पुरंदरमधील २८ गावांना टंचाई पीक अनुदानापोटी ७ कोटी ७२ लाख ६३ हजार १०४ रुपयांचे अनुदान मंजूर झाले. जलसंपदा राज्यमंत्र्यांनी काही गावांत अनुदानाचे प्रतीकात्मक वाटपही केले

बाळासाहेब काळे,  जेजुरीपुरंदरमधील २८ गावांना टंचाई पीक अनुदानापोटी ७ कोटी ७२ लाख ६३ हजार १०४ रुपयांचे अनुदान मंजूर झाले. जलसंपदा राज्यमंत्र्यांनी काही गावांत अनुदानाचे प्रतीकात्मक वाटपही केले. मात्र, तहसील प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ही रक्कम अद्यापही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेली नाही. टंचाई संपल्यानंतर अनुदान मिळणार का, असा सवाल येथील शेतकरी करीत आहेत.शासकीय मदत ही दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्याला मोठा दिलासा देणारी ठरते. मात्र, पुरंदर तहसील प्रशासनाला याचे काही सोयरसुतक नाही, असे दिसत आहे. याबाबत तहसीलदारांनी चेकबुक नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.शासनाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाची ५० पेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या गावांना टंचाई पीक अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यानुसार २८ गावांना टंचाई पीक अनुदान देण्याची पुरंदर तहसील विभागाकडून शासनाकडे सुमारे ९ कोटी ५५ लाख एक हजार ४ रुपयांची मागणी केली होती. यापैकी ७ कोटी ७२ लाख ६३ हजार १०४ रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. उर्वरित रक्कम केवळ शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक न मिळाल्याने माघारी गेली आहे. शेतकऱ्याना देय रक्कम शासकीय ट्रेझरीत जमा असून ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेली नाही. दोन महिन्यांपूर्वी राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे तसेच पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांनी या टंचाई अनुदानवाटपाचा मोठा गाजावाजा करीत काही गावांतून कार्यक्रम घेतले. काही रकमेचे प्रतीकात्मक चेकही वाटप केले. मात्र, उर्वरित शेतकऱ्यांची रक्कम दुसऱ्या टप्प्यात वर्ग होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील रक्कम अजूनही मिळालेली नाही. टंचाई अनुदानवाटपाचा कार्यक्रम होऊन दोन महिने उलटले, तरीही रक्कम जमा झालेली नाही. शेतकऱ्यासमोर गंभीर प्रश्न असताना ही रक्कम मिळणे आवश्यक होते. गावकामगार तलाठी, मंडलाधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांनी विचारणा केली असता त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. > १४ गावे : रब्बीच्या वाटपाचीही प्रतीक्षारब्बी हंगामाची ५० पेक्षा कमी पैसेवारी लागलेल्या गावांची ही टंचाई पीक अनुदानासाठी पात्र यादी तयार करण्यात आली होती. तसे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. यात पांडेश्वर, मावडी क. प., कर्नलवाडी, राजेवाडी, आंबळे, माळशिरस, टेकवडी, पोंढे, गुरोळी, वाघापूर, राजुरी, रिसे, पिसे, नायगाव ही १४ गावे जाहीर करण्यात आलेली आहेत. त्या गावांचे काय? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, त्या गावांना टंचाई अनुदान देण्याबाबत शासकीय पातळीवरून काहीच निर्णय झालेला नसल्याचे समजते. याही गावांना शासनाकडून टंचाई अनुदान मिळावे, अशी मागणी होत आहे.गावाचे नाव व कंसात अनुदान रक्कम वाल्हे (१२७१६२७), जेजुरी (६१५९४७४), कोळविहिरे (२६३४९२०), नावळी (६७८८८०), दौंडज (१४०५३००) राख (३४१३०६७), पिंगोरी (८९४३६०), पिंपरी (४४९२४५४), साकुर्डे (५७२१७३६), शिवरी (६४८५७७६), तक्रारवाडी (५४५३१६), परींचे (७४१६१३२), हरणी (२८७७७८४), मांढर (४३५२९१२), धनकवडी (१०७२४३४), दवणेवाडी (७२०६६४), पांगारे (१४२३०९२), पिंपळे (३३४१३९६), हरगुडे (१३४०१५२), बोरहाळवाडी (२९९८५४०), खेंगरेवाडी (५३१२४०), शिंदेवाडी (७२४२६४), घेरा पुरंदर (७९८४१७), मिसाळवाडी (२०९९६०), काळदरी (२८३६६२०), चिव्हेवाडी (१८२८४०), भैरावाडी (४४२७४०) आणि बांदलवाडी (८४६३५६).