शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईच्या झळा भक्तीलाही!

By admin | Updated: April 21, 2017 06:02 IST

येथील मळगंगा देवीचा यात्रोत्सव उत्साहात साजरा झाला. परंतु कडक उन्हाळा पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच शेतमालाला भाव नसल्याने यात्रेला

टाकळी हाजी : निघोज (ता. पारनेर) येथील मळगंगा देवीचा यात्रोत्सव उत्साहात साजरा झाला. परंतु कडक उन्हाळा पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच शेतमालाला भाव नसल्याने यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या मात्र रोडावली. दरवर्षी यात्रेसाठी सहा ते सात लाख भाविक येत असतात. मात्र यावर्षी लाखभर भावकांच्या पुढे हा आकडा गेलाच नाही. परिसरात पाण्याची टंचाई आहे. येथे दिवसाआड नळपाणी पुरवठा योजनेला पाणी येते. याचा मोठा परिणाम यात्रेवर झाल्याचे दिसून आले आहे. बुधवारी निघालेल्या छबिन्याला गर्दीचे प्रमाण फारच अत्यल्प होते. मळगंगा देवीचा जयजयकार करीत भाविकांनी गुरुवारी सकाळी ८ वाजता निघालेल्या श्रींच्या घागरीचे दर्शन घेतले. देवीची मुख्य यात्रा बुधवारपासून सुरू झाली आहे. रात्री ११च्या दरम्यान चांदीच्या घागरीचे दर्शन भाविकांना देवीच्या हेमांडपंती बारवेत झाले. सकाळी मानकरी तसेच देवाचे पुजारी गायखेबंधू यांच्या हस्ते घागरीची पूजा करण्यात आली. त्यानंतर ही घागर मिरवणूक सुरू झाली. ही घागर दर्शनाकरिता मंदिरात ठेवण्यात आल्यानंतर मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले.या वेळी मळगंगा देवीच्या ८५ फूट काठीबरोबरच इतर गावांतून आलेल्या काठीची व पालखीची मिरवणूक काढण्यात आली. तब्बल सहा तास ही मिरवणूक चालली. ढोलताशा, लेझीम पथक, झांज पथक यांच्या निनादात भंडाऱ्याची उधळण करीत व आई मळगंगा मातेचा जयजयकार करीत निघालेल्या मिरवणुकीमुळे परिसर दणाणून गेला होता. यात्रेसाठी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट गावकरी ग्रामस्थ व विविध मंडळांनी तसेच ग्रुप ग्रामपंचायतीने चांगले नियोजन केले होते.