शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

धोंडे खायला जावई निघाले सासुरवाडीला

By admin | Updated: June 18, 2015 22:56 IST

अधिकमास सुरू झाला असून अधिकमासाचे महत्त्व हिंदू धर्मशास्त्रामध्ये मोठे मानले जाते. या महिन्यात लाडक्या जावयाला अधिकमासाचे वाण

राजेगाव : अधिकमास सुरू झाला असून अधिकमासाचे महत्त्व हिंदू धर्मशास्त्रामध्ये मोठे मानले जाते. या महिन्यात लाडक्या जावयाला अधिकमासाचे वाण दिले जाते. जावयाला पुरणाचे धोंडे (दिंडे) खायला देणे यावरूनच अधिकमासास ‘धोंड्याचा महिना’ असे म्हणतात. जावई व मुलीला धोंड्याच्या बरोबरीने नवीन कपडेही दिले जातात. विशेषत: यावर्षीच लग्न झालेल्या जावयाला धोंडे देण्याचा कार्यक्रम विशेष असतो. जवळजवळ ३३ महिन्यांनंतर हा महिना अधिक केला जातो. त्यामुळे त्याला अधिकमास असे म्हटले जाते. जावयाला श्रीविष्णू म्हणजेच नारायणाचे रूप मानले जाते, तर मुलीला (लेकीस) विष्णुपत्नी लक्ष्मीचे रूप मानले जात असल्याने त्यांना वाण देण्याने मोठे पुण्य लाभते, असे मानले जाते. संस्कृतमध्ये ‘अपूप’ म्हणजेच अनारसा होय. असे हे ३३ अनारशांचे वाण चांदीच्या ताटात सुवर्ण मोहरांसह जावयाला देण्याची प्रथा आहे. जावयाला वाण दिल्यावर पृथ्वीलोक; तसेच स्वर्गलोकाचेही पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते. हे दान देताना अनारशाऐवजी बत्तासे किंवा म्हैसूरपाक यांचाही समावेश केला जातो. अधिकमासाच्या पवित्र कालावधीत दीपदानाचे महत्त्व फार मोठे आहे. दीप म्हणजे विष्णुपत्नी लक्ष्मी हिचे प्रतीक, म्हणजेच समृद्धीचे प्रतीक मानले जाते. चांदीच्या ताटात निरांजन म्हणजे दिवा (दीप) दिला जातो. सोने किंवा चांदीऐवजी इतर धातू तांबे, पितळ यांचाही दिवा देण्याची प्रथा आहे. आपल्या ऐपतीनुसार देवाच्या पूजेची चांदीची उपकरणी (निरांजन, पंचारती, तबक, तांब्या, भांडे, कलश, कोयरी, कुंकवाचा करंडा, ताम्हन, पळी, पंचपात्र, उदबत्तीची सोंगटी, घंटा, अभिषेक पात्र इ.) दानात दिली जातात. सवाष्णींच्या ओट्या भरणे; तसेच चांदीची जोडवी देणे, लक्ष्मीस प्रिय असणारे तांबुलदान अशी दाने दिली जातात. (वार्ताहर)शुभकार्यास काळ अनुकूल नाहीमलठण येथील प्रसिद्ध पुरोहित सचिन अवचट यांचे मते, हा महिना १३ वा म्हणून मळासारखा अधिक झालेला म्हणून त्याला ‘मलमास’ संबोधतात. या कालावधीत विवाह, उपनयन आदी धार्मिक संस्कार; तसेच गृहप्रवेश, वास्तुप्रवेश, देवप्रतिष्ठा, चौलकर्म इ. गोष्टी केल्या जात नाहीत. शुभकार्यास हा काळ अनुकूल मानला जात नाही.