शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

सणसवाडी-वसेवाडी शाळा बनली डिजिटल

By admin | Updated: March 28, 2017 02:18 IST

केंद्र शासनाने प्रत्येक शाळा डिजिटल करण्याचे धोरण आखले असल्याने सणसवाडी-वसेवाडी (ता. शिरूर) येथील

कोरेगाव भीमा : केंद्र शासनाने प्रत्येक शाळा डिजिटल करण्याचे धोरण आखले असल्याने सणसवाडी-वसेवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यासाठी क्राफ्ट्समन आॅटोमेशन कारखान्याच्या वतीने दोन एलईडी स्क्रीन, फर्निचरसह संगणक कक्ष आदी पाच लाखांच्या विविध वस्तू देण्यात आल्या असून, गरजू विद्यार्थ्यांना पुढील वर्षापासून शिष्यवृत्तीही देण्यात येणार असल्याचे सांगितले.वसेवाडी शाळेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी परराज्यातील आहेत. अशा परिस्थितीतही शाळेची गुणवत्ता चांगली असल्याने शाळेकडे मुलांचा मोठा ओढा आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासात शाळेच्या १३ शिक्षकांचे योगदान मोठे असल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थही शाळेच्या विकासात योगदान देत आहेत. ग्रामपंचायतीने शाळेस यापूर्वी सीसीटीव्ही यंत्रणा, शुद्ध पाणी प्रकल्प देण्याबरोबरच शाळेची रंगरंगोटीही केली आहे. ग्रामपंचायत सदस्य रमेश सातपुते यांच्या पुढाकाराने शाळेस ‘सेको’ कारखान्याने नुकतेच शालेय साहित्यही भेट दिले होते.वसेवाडी शाळेच्या गुणवत्तेचा आलेख पाहून क्राफ्ट्समन आॅटोमेशन कारखान्याने ५५ इंची दोन एलईडी स्मार्ट टीव्ही, ग्रंथालय पुस्तके, १२ टेबल, २२ खुर्च्या व संगणक कक्षास १ लाखाचे फर्निचर भेट दिले. या सर्व वस्तू कंपनीचे मुख्याधिकारी विष्णू गंग्रस यांच्या हस्ते शाळेस प्रदान करण्यात आल्या. या वेळी पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप, उपसभापती मोनिका हरगुडे, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, सरपंच वर्षा कानडे, दत्तात्रय हरगुडे, पंडित दरेकर, वैभव यादव, सोमनाथ दरेकर, रंगनाथ हरगुडे, नवनाथ हरगुडे, रमेश सातपुते, सुनीता दरेकर, नीता हरगुडे, सुनीता दरेकर, दीपाली हरगुडे व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या वेळी कारखान्याचे अधिकारी जयंत चिकनगावकर, मनोज दिवटे, सुगुमार, मोहन कृष्णन, व्यंकट रमण, जी. आर. विश्वनाथन, मंदार देवासीस आदी उपस्थितांचा शाळेच्या वतीने मुख्याध्यापक बन्सिलाल ढगे, उपशिक्षक संतोष तांबे, नाथू ढेरे, कल्याणी उमाप, ज्योती गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार संतोष हरगुडे यांनी मानले.