शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

संदीपने जीवनयात्रा संपवली आणि तो पास झाला...

By admin | Updated: May 26, 2016 03:33 IST

बारावी निकालाच्या धसक्याने निमगाव-खंडोबा (ता. खेड) येथील संदीप ज्ञानेश्वर शिंदे (वय २१) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गणिताच्या पेपरात नापास

राजगुरुनगर : बारावी निकालाच्या धसक्याने निमगाव-खंडोबा (ता. खेड) येथील संदीप ज्ञानेश्वर शिंदे (वय २१) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गणिताच्या पेपरात नापास होण्याच्या भीतीने त्याने हे पाऊल उचलले. मात्र, तो ५४ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप शिंदे याने बारावीची परीक्षा दिली होती. आज निकाल होता, पण आपण नापास होऊ या भीतीने तो सकाळी सहा वाजताच घराबाहेर पडला. शेतात कामासाठी गेला असेल असे आई-वडिलांना वाटले. मात्र, त्याने शेतात जाऊन आत्महत्या केली. आपल्या शेतातील छपराच्या वाश्यास दोर लावून त्याने आपले जीवन संपविले. सकाळी आठच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर निमगाव येथेच त्याचा अंत्यविधी झाला. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हा अतिशय शांत स्वभावाचा मुलगा होता. त्याचे वडील निमगावला पोस्टमन आहेत. त्याला एक लहान बहीण असून तो आईवडिलांना एकटाच मुलगा होता. राजगुरुनगरच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातून त्याने बारावी सायन्सची परीक्षा यापूर्वी दोनदा दिली होती. मात्र, दोन्हीवेळा तो नापास झाल होता. त्याचा गणित हा विषय राहिला होता. तो पुन्हा सर्व विषय घेवून परीक्षल्ौा बसला होता. गणिताचा पेपर अवघड गेल्याने या वेळीही आपण नापास होऊ, या धास्तीने त्याने आज आपले जीवन संपविले. संदीप सर्व विषय घेवून बारावीच्या परीक्षेला बसला होता. तो ५४ टक्के गूण मिळवून उत्तीर्ण झाला असल्याचे हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्राचार्य एस.बी. पाटील यांनी लोकमशी बोलताना सांगितले.