शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यातून पळवला वाळूचा ट्रक

By admin | Updated: September 30, 2015 01:21 IST

मंडल अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने ताब्यात घेऊन, इंदापूर पोलीस ठाण्यात जमा केलेला बेकायदा वाळू वाहतूक करणारा ट्रक पोलीस ठाण्यातून पळवला गेल्याचे उघडकीस आले आहे.

इंदापूर : मंडल अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने ताब्यात घेऊन, इंदापूर पोलीस ठाण्यात जमा केलेला बेकायदा वाळू वाहतूक करणारा ट्रक पोलीस ठाण्यातून पळवला गेल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत खुद्द पोलीस निरीक्षकांकडून तहसील कार्यालयाला सांगितले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ट्रक पळवला जाण्याच्या कथित प्रकरणासंदर्भात तत्काळ खुलासा करण्यात यावा. खुलासा वेळेत दिला नाही, तर जिल्हाधिकारी व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना तसा सविस्तर अहवाल पाठविला जाईल, अशी तंबी पत्राद्वारे तहसीलदारांनी इंदापूरच्या पोलीस निरीक्षकांना दिली आहे. तालुक्यातील अनधिकृत वाळू वाहतूक व उत्खनन रोखण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाने अनधिकृत वाळू वाहतूक करणारा ट्रक (एमएच ४२/टी ५१०७) ताब्यात घेऊन दि. २२ सप्टेंबर रोजी इंदापूर पोलीस ठाण्यात जमा केला. ट्रकवर महसूल विभागाने कसलीही दंडात्मक कारवाई केली नव्हती. या पार्श्वभूमीवर, तो ट्रक पोलीस ठाण्यामधून पळवला गेला असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून तहसील कार्यालयाला सांगण्यात आले. या प्रकारामुळे अनधिकृत वाहतूक करणाऱ्यांवर पोलीस यंत्रणेचा वचक राहिलेला नाही, असा ठपका ठेवून शासनाच्या प्रमुख घटकांकडून अशी चूक होते, हे कायद्याच्या दृष्टीने योग्य नाही. पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. पोलीस यंत्रणेकडून कायद्याची पायमल्ली होत असेल, गुन्हेगारांना चरण्यासाठी आयते कुरण मिळत असेल तर आपणावरील विश्वासार्हता कमी होत असल्याचे दिसून येते, असे पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. याबाबत तहसीलदारांनी पोलीस निरीक्षकांकडे तत्काळ खुलासा मागितला आहे. (वार्ताहर)