शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी महाराज जयंती साजरी

By admin | Updated: May 16, 2014 04:43 IST

पूजा, अभिषेक, मानवंदना, छत्रपती शंभूप्रेरणा ज्योत, व्याख्याने आणि शाहिरी संगीत कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांनी छत्रपती संभाजीमहाराज जयंती सोहळा मोठ्या उत्साहात झाला.

लोणी कंद : पूजा, अभिषेक, मानवंदना, छत्रपती शंभूप्रेरणा ज्योत, व्याख्याने आणि शाहिरी संगीत कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांनी छत्रपती संभाजीमहाराज जयंती सोहळा मोठ्या उत्साहात झाला. श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे संभाजीराजांची बलिदानभूमी आहे. सकाळपासून ही भूमी शंभूभक्तांनी गजबजून गेली होती. प्रारंभी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक संदीप अप्पा भोंडवे यांच्या हस्ते पूजा व अभिषेक झाला. या वेळी सरपंच जयश्री शिवले, उपसरपंच गणेश पुजारी, संतोष शिवले, हनुमंत शिवले, शिवव्याख्याते गणेश फरताळे, पंडित शिवले, संजय शिवले, ज्ञानेश्वर शिवले, अण्णासाहेब चव्हाण, गजानन शिवले मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. प्रारंभी समस्त ग्रामस्थ वढू बुद्रूक यांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग आरगडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी प्रेरणाज्योत संदीप भोंडवे यांच्या हस्ते प्रज्ववित करून ५० कार्यकर्त्यांनी दौडत नेली. शंभूप्रेमी मंडळ सातारा, छत्रपती संभाजी मंडळ नाशिक यांनी ही ज्योत प्रज्वलित करून नेल्या. या वेळी तरुणाईचा उत्साह होता. छाया संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जयंती सोहळा आयोजित केला होता. प्रदेशाध्यक्ष दयानंद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्हाध्यक्ष विष्णूजी नागणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्र्यंबकेश्वरचे उपनगराध्यक्षा ललिता शिंदे यांनी आपल्या सहकार्‍यांसह येऊन मानवंदना दिली. विजय काळे यांचा शाहिरी कार्यक्रम झाला. शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख दत्ता आबा गायकवाड व शंभूभक्त सुभाष गायकवाड यांनी स्वतंत्रपणे मानवंदना दिली. शंभुराजे चॅरिटेबल ट्रस्ट, छावा संघटना, पुणे, झुंजार ग्रुप, गड किल्ले संघटना, उत्कर्ष मराठा संघ आदींचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. संतोष शिवले यांनी आभार मानले.(वार्ताहर)