शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य परिषद 'आपली' संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:11 IST

अनिल अवचट : मसाप जीवनगौरव पुरस्कार लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद ही सर्वांना सामावून घेणारी, ...

अनिल अवचट : मसाप जीवनगौरव पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद ही सर्वांना सामावून घेणारी, आपल्या सर्वांची संस्था आहे. आपणच संस्था मोठी केली पाहिजे, हातभार लावला पाहिजे. माझा साहित्य परिषदेशी ५० वर्षांचा दृढ ऋणानुबंध आहे'', अशी भावना लेखक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केली. लॉकडाऊनमुळे नवीन पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मसापचा जीवनगौरव पुरस्कार डॉ. अनिल अवचट यांना जाहीर झाला आहे. ''पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाधान वाटते आहे. माझ्यापेक्षाही जास्त आनंद माझ्या मित्रमंडळींना झाला आहे'', अशा भावना अवचट यांनी व्यक्त केल्या.

अनिल अवचट हे साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्तò आहे. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून त्यांनी उभे केलेले सामाजिक कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. ‘अमेरिका’, ‘अक्षरांशी गप्पा’, आपले‘से’, ‘आप्‍त’, ‘गर्द’, ‘धागे आडवे उभे’, ‘पुण्याची अपूर्वाई’, ‘माणसं’, ‘सुनंदाला आठवताना’, ‘हमीद’ अशी त्यांची २५ हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. अनिल अवचट यांची ओरिगामी कलाही थक्क करणारी आहे. साहित्य अकादमीतर्फे बाल-साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेकडून साहित्य जीवन गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत.

''मी 1970 सालच्या दरम्यान 'पूर्णिया' हे पुस्तक लिहिले तेव्हा मला साहित्य परिषदेत १५०-२०० रुपयांचे बक्षीस मिळाले होते. त्यानंतर आजतागायत अनेक कार्यक्रमांना वक्ता, श्रोता म्हणून जाण्याचे प्रसंग आले. साहित्य परिषद मला कायमच आपलीशी वाटते.''