शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सहकारमहर्षी शिवाजीराव काळे यांचे काम पथदर्शी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जुन्नर : पंचायत राज व सहकारक्षेत्रात सहकारमहर्षी शिवाजीराव काळे यांनी पथदर्शी काम केले आहे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जुन्नर : पंचायत राज व सहकारक्षेत्रात सहकारमहर्षी शिवाजीराव काळे यांनी पथदर्शी काम केले आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

जुन्नर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बसविण्यात आलेल्या सहकारमहर्षी शिवाजीराव महादेवराव तथा दादासाहेब काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बाजार समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, शिवाजीरावांनी तालुक्यात सहकार चळवळ व संस्था निर्माण केल्या. माझ्यापेक्षा अधिक काळ शिवाजीरावांनी समाजकारण व राजकारणात घालविला आहे. सुरुवातीला जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी यांच्या विचाराचे शिवाजीराव होते. जिल्ह्यात ग्रामीण भागात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे ते प्रणेते होते. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे ते साक्षीदार होते. विधानसभेत जागृत सभासद म्हणून त्यांचा लौकिक होता. महाराष्ट्रातील पहिल्या पुणे जिल्हा परिषदेचे पहिले उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. ५५ वर्षे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम केले. शिवाजीराव यांच्या पूर्णाकृती पुतळा राजकारण व सहकार क्षेत्राला प्रेरणा देणारा आहे. केंद्र सरकार कृषी क्षेत्राकडे लक्ष देत नाही. परिणामी, शेतमालाच्या किमती घसरतात. राज्या बाहेरील दलाल शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करतात. यासाठी कठोर पावले उचलावी लागतील. यापुढे शेतकऱ्यांची लूट करता येणार नाही. गरजेनुसार शेती कार्यपद्धतीत बदल करण्याच्या, तसेच बाजार समितीच्या माध्यमातून शीतगृह उभारण्याची सूचना त्यांनी केल्या.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, केंद्र सरकार सहकार क्षेत्रावर लक्ष ठेवून आहे. राज्यातील सहकार क्षेत्राला एक वेगळे वळण देण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे. यासाठी सहकार क्षेत्रात एकत्रितपणे काम करावे लागेल. शासनावर अवलंबून न राहता काम करावे लागेल. राज्यात बाजार समिती अधिक सक्षम करने गरजेचे असून शेती प्रक्रिया उद्योग, शेतमाल साठवणुकीसाठी शीतगृह उभारण्याचे शासनाचे नियोजन असल्याचे सहकार व पणन मंत्री सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी या वेळी बोलताना सांगितले. समितीचे संजय काळे प्रास्ताविक करताना म्हणाले की, शरद पवार यांच्या हस्ते शिवाजीराव काळे यांच्या पुतळ्याचे अनावरण हा तालुक्याचे सहकार क्षेत्र व काळे कुटुंबीयांच्या दृष्टीने भाग्याचा क्षण आहे. राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती चौथ्या क्रमांकावर असून १२०० कोटी रुपयांची उलाढाल आहे. कोरोनाच्या काळातदेखील बाजार समितीचे कामकाज सुरू ठेवून शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होऊन दिल नाही. बाजार समितीच्या वतीने करण्यात आलेल्या सहकार महर्षी या स्मरणिकेचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार अतुल बेनके, आमदार दिलीप मोहिते, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला ताई पानसरे, माजी आमदार शरद सोनवणे, बाळासाहेब दांगट, नगराध्यक्ष श्याम पांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर , तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार , शहरअध्यक्ष पापाशेठ खोत, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, उज्ज्वला शेवाले, उपसभापती दिलीप डुंबरे या वेळी उपस्थित होते.

शरद पवार यांनी बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयास देखील भेट दिली. बाजार समितीचे संचालक धोंडीभाऊ पिंगट, निवृत्ती काळे, दीपक आवटे, संतोष तांबे, धनेश संचेती, संतोष घोगरे, योगेश शेटे, सुमन बोराडे, सचिव रुपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे या वेळी उपस्थित होते.

फोटो ओळ : शिवाजीराव महादेवराव तथा दादासाहेब काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थित सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे व मान्यवर (२) बाजार समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात स्मरणिकेचे प्रकाशन करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे व मान्यवर.

050921\screenshot_20210905-162700.jpg

????????? ????????? ??? ????????? ???? ??????? ?????????? ??????????? ?????? ??? ???? ??????? ????? ??????? ??? ?????? ??????? ????? ?????? ????????? ?????, ??????????? ????????? ????,???? ??????? ????? ??????? ?????? ?? ???? ???? ,? ???????