शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनांच्या उच्चाटनासाठी धावली तरुणाई

By admin | Updated: June 28, 2017 04:25 IST

जागतिक अमली पदार्थविरोधी दिवसानिमित्त मुक्तांगण मित्र, पुणे शहर पोलीस आणि पुणे रनिंग यांच्यातर्फे आयोजित मॅरेथॉनमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जागतिक अमली पदार्थविरोधी दिवसानिमित्त मुक्तांगण मित्र, पुणे शहर पोलीस आणि पुणे रनिंग यांच्यातर्फे आयोजित मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन तरुणांनी व्यसनाच्या उच्चाटनात सहभागी होण्याचा निर्धार केला. नॉर्कोटिक कंट्रोल ब्युरोचे संचालक संजयकुमार झा आणि गुन्हे शाखेचे उपआयुक्त डॉ. सुधीर हिरेमठ यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉनला प्रारंभ झाला. विमाननगर येथील सिम्बॉयोसिस महाविद्यालयापासून १५, १०, ५ आणि ३ किलोमीटर अशा विविध टप्प्यांमध्ये झालेल्या या मॅरेथॉनमध्ये महिला, पुरुष, तरुण-तरुणी अशा सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. एव्हरेस्ट सर केलेल्या विमाननगर शाखेच्या सदस्या अपर्णा प्रभुदेसाई या वेळी उपस्थित होत्या. पुणे रनिंगतर्फे आफ्रिकेतील ७८ किलोमीटरच्या कॉम्रेड या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेले सर्व कॉम्रेड देखील या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. संजयकुमार झा म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांत व्यसनाला प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. चित्रपटांमध्ये कलाकार देखील सर्रासपणे व्यसन करताना दिसतात आणि हेच कलाकार युवकांचे आदर्श असल्याने तरुणांकडून त्यांच्या व्यसनांचे अनुकरण केले जाते. त्यामुळे व्यसनांना जणू समाजमान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळेच व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. महिलाही व्यसनाधिनतेकडे झुकत असल्याचे आढळून येते.’’डॉ. सुधीर हिरेमठ म्हणाले, ‘‘व्यसनाधिनतेचा वयोगट कमी होत चालला आहे. लहान वयातच मुलांना रोखता आल्यास भविष्यात रुद्ररूप धारण करू पाहणाऱ्या व्यसनाधिनतेला वेळीच थोपवता येईल. यासाठी व्यायामाची गोडी लावणेही आवश्यक आहे.’’