शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी ‘इलेक्शन मोड’मध्ये, ‘होर्डिंग’बाजीचा उडवला बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिका निवडणुकीला एक वर्ष राहिलेले असताना भाजपने आता आपली कामे लोकांपर्यंत पोहोचवायला शहरात होर्डिंग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महापालिका निवडणुकीला एक वर्ष राहिलेले असताना भाजपने आता आपली कामे लोकांपर्यंत पोहोचवायला शहरात होर्डिंग लावण्याचा सपाटा लावला आहे. होर्डिंगच्या माध्यमातून पुणेकरांपर्यंत कामे पोहोचवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी चालू केला आहे. गमतीचा भाग म्हणजे हे कॅम्पेन थेट केंद्रातून राबवले जात असल्याचे सांगत शहर पदाधिकारी मात्र आपल्याला याचा काहीच पत्ता नसल्याचा दावा करत आहेत.

शहरातल्या प्रमुख चौकांमध्ये सध्या मोठी होर्डिंग झळकू लागली आहेत. ‘विकसित होत आहे आपलं पुणे. दृढ होतो आहे विकासकामांवरील विश्वास’, असा संदेश आणि भाजपचे चिन्ह त्यावर आहे.

शहरातल्या वेगवेगळ्या भागांतले हे फलक भाजपच्या महापालिका निवडणूक तयारीचाच भाग असल्याचे सांगितले जात आहे. पुढचे वर्षभर असेच फलक शहरभर लावले जाणार आहेत. अर्थात भाजपने जाहीरनाम्यात मांडलेले अनेक प्रकल्प अजूनही अपूर्ण आहेत. त्यामुळेच या जहिरातींच्या माध्यमातूनच पुन्हा प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपाने चालू केला आहे का, अशी चर्चा पुण्यात रंगली आहे.

या मोहिमेचा तपशील मात्र भाजप थेट केंद्रीय पातळीवरून ठरवत आहे. त्यामुळे शहरातील मोजक्या भाजपा पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता इतरांना याचा काहीच पत्ता नाही. पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर म्हणाले, “आम्ही हैदराबाद सारख्याच ताकदीने मुंबई, पुणे महापालिकेची निवडणूक भाजपा लढवणार आहे. त्याचाच भाग म्हणून ही मोहीम राबवली जात आहे.”