शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

नियम धाब्यावर बसवून बढती

By admin | Updated: April 21, 2017 05:54 IST

मुंबईतील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात नियम धाब्यावर बसवून बढत्या दिल्याचा प्रकार माहिती अधिकारातून उजेडात आला आहे

मंगेश पांडे , पिंपरी मुंबईतील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात नियम धाब्यावर बसवून बढत्या दिल्याचा प्रकार माहिती अधिकारातून उजेडात आला आहे. पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरविले असतानाही कामगार मंडळात खिरापत वाटल्याप्रमाणे बढती देण्याचा कारभार दिसून येत आहे. त्यामुळे मंडळ कामगारांऐवजी अधिकाऱ्यांचे ‘कल्याण’ साधत आहे. कामगार कल्याण मंडळाने एका अधिकाऱ्याला कामगार विकास अधिकारी या पदावर २००६ ला तात्पुरती बढती दिली होती. तीन वर्षे या पदावर काम न करताच आॅगस्ट २००७ ला थेट सहायक कल्याण आयुक्त या पदावर पुन्हा बढती देण्यात आली. त्यांचा सेवाकाळ २००६ पासून मुंबई मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणीच होता. जून २०१२ ला बदली आदेशपत्र निघून देखील त्यांच्या बदलीचा आदेश रद्द न करताच त्याठिकाणी २०१५ पर्यंत ते कार्यरत होते. गेले आठ वर्षे उलटूनही संबंधित अधिकारी त्या पदावर आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते बाबूराव पाटील यांना माहिती अधिकारातून मिळाली आहे. सध्याचे प्रभारी कल्याण अधिकारी सतीश दाभाडे यांचे जात प्रमाणपत्र आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था तसेच नागपूर अनुसूचित जमाती पडताळणी समितीने अवैध ठरविले. तरीदेखील कामगार कल्याण मंडळाने राखीव कोट्यातून असलेल्या जागेवर ८ नोव्हेंबर २००० ला कामगार विकास अधिकारी या पदावर त्यांना पदोन्नती दिली. त्यानंतर २४ फेबु्रवारी २००४ ला पुन्हा सहायक कल्याण आयुक्त या पदावर पदोन्नती देण्यात आल्याचे माहिती अधिकारातून उजेडात आले.