शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

आरटीईच्या जागा रिक्तच

By admin | Updated: April 25, 2015 05:05 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागा भरण्यात अनेक शाळांमध्ये उदासीनता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागा भरण्यात अनेक शाळांमध्ये उदासीनता असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुर्व प्राथमिक व पहिलीमधील एकुण १३ हजार ४८४ जागांपैकी अद्याप ११ हजार ३८० जागा रिक्त आहेत. आरटीईअंतर्गत पुर्व प्राथमिक की पहिलीपासून प्रवेश द्यायचे याबाबत असलेला गोंधळ तसेच शुल्क परताव्यावरून अनेक शाळांना प्रवेश देण्यास नकार दिल्याने ही स्थिती उदभवली आहे. आरटीईनुसार शैक्षणिक वर्ष २०१५-१६ साठी २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पुणे पालिका क्षेत्रातील २१४, पिंपरी चिंचवड पालिका क्षेत्रातील १२५ आणि हवेली तालुक्यातील १०८ अशा एकुण ४४७ शाळा यासाठी पात्र आहेत. त्यामध्ये पुर्व प्राथमिकसाठी एकुण ५ हजार २०० तर पहिलीसाठी ८ हजार २८४ प्रवेश क्षमता आहे. मात्र बुधवार दि. २२ एप्रिलपर्यंत केवळ १५ टक्के जागांवरच प्रवेश झाले आहेत. सद्यस्थितीत आरटीई प्रवेशावरून शाळांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे. कायद्यानुसार वय वर्षे ६ च्यापुढील म्हणजे पहिलीमध्ये आरक्षित जागा ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार ‘एन्ट्री पॉईंट’ म्हणजे पुर्व प्राथमिक किंवा पहिलीपासून प्रवेश करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात शिक्षण संचालकांनी दिलेल्या आदेशानुसार पुर्वलक्षी प्रभावाने पहिलीमध्ये प्रवेश करण्यास सांगण्यात आले आहे. या आदेशामुळे शाळांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ज्या शाळांनी एन्ट्री पॉईंट पुर्व प्राथमिक म्हणून प्रवेश दिले आहेत, त्या शाळांनी आता पुन्हा पहिलीमध्ये प्रवेश करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे प्रवेशासाठी पात्र ठरूनही मुलांना प्रवेश मिळत नाहीत. त्यामुळे हजारो जागा रिक्त राहिल्या आहेत. (प्रतिनिधी)