शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशास मुदतवाढ

By admin | Updated: March 15, 2017 03:40 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) देण्यात येणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी दि. १८ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) देण्यात येणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी दि. १८ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे अद्याप पाल्याचा प्रवेश न घेतलेल्या पालकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आरटीई प्रवेशाबाबत पालक उदासीन असल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे १२ हजारांपैकी केवळ ३४०० प्रवेश निश्चित झाले आहेत.राज्यात सर्व जिल्ह्यांत ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. आलेल्या प्रवेश अर्जांमधून लॉटरी पद्धतीने प्रवेशास पात्र ठरलेल्या मुलांच्या प्रवेशासाठी काही जिल्ह्यांमध्ये दि. १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, तीन दिवस आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पालकांनी प्रवेशाची मुदत वाढविण्याची मागणी केली होती. विद्यार्थीहित लक्षात घेऊन पहिल्या लॉटरीतून प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन प्रवेश घेण्याची मुदत दि. १८ मार्चपर्यंत वाढविण्यात येत आहे, असे शिक्षण संचालक (प्राथमिक) गोविंद नांदेडे यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, प्रवेशासाठी पात्र ठरूनही हजारो प्रवेश अद्याप झाले नसल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ८४९ शाळांमध्ये १५ हजार ६९३ आरटीईची प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी ३६ हजार ९३३ अर्ज आले आहेत. पहिल्या लॉटरीमध्ये त्यापैकी १२ हजार २४३ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश घेण्यासाठी दि. ६ मार्चपासून सुरुवात झाली. आधीच्या वेळापत्रकानुसार प्रवेशाची अंतिम मुदत दि. १५ मार्चपर्यंत होती. तरीही दि. १४ मार्चपर्यंत केवळ ३ हजार ४१४ विद्यार्थ्यांचेच प्रवेश झाले आहेत. अद्यापही ८ हजार ८२९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित नाहीत. प्रवेशाची मुदत वाढविण्यात आल्याने त्यामध्ये कितपत वाढ होईल, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.