शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘क्युनेट’द्वारे ४० लाख रुपयांचा गंडा

By admin | Updated: January 12, 2017 03:25 IST

‘क्युनेट’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई करून देण्याचे आमिष दाखवून १० पुणेकरांना

पुणे : ‘क्युनेट’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई करून देण्याचे आमिष दाखवून १० पुणेकरांना ४० लाखांना गंडवण्यात आले असून, देशभरातील तब्बल २०० जणांना फसवण्यात आले आहे. या रॅकेटमधील चौघांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे.टिनू रोशनलाल वाधवानी (वय २४, रा. लखनौ, उत्तर प्रदेश), सिद्धार्थ अरुण हरले (वय ३०, रा. जुनी सांगवी), विजय काशिनाथ भोई (वय २७, रा. मळकर रोड, आळंदी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदर मयूरी खानवाले, स्वप्निल जाधव व विनोद पचराला हे आरोपी फरार झाले आहेत. याप्रकरणी महेश उत्तम माने (वय २८, रा. नवी सांगवी) यांनी तक्रार दिली आहे. यातील मयूरी व टिनू हे मुख्य आरोपी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागरिकांना स्वत:चा उद्योग करण्यास उद्युक्त करून पैसे भरायला लावत. पैसे भरल्यावर मल्टीलेवल मार्केटिंग पद्धतीने आणखी सभासद करायला सांगितले जात. या पैशांमधून कमिशन देण्याचे आमिषही दाखवण्यात येई. फिर्यादी माने आणि आरोपी हरले हे मित्र आहेत. हरले याने मानेला फोन करून व्यवसायासाठी दोन लोकांची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. मोठ्या व्यवसायामधून तब्बल पाच कोटींचे कमिशन मिळेल, असे सांगितले. व्यवसायाची माहिती न देता त्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन अन्य आरोपींची ओळख भागीदार म्हणून करून दिली. त्यांना व्यवसायासाठी चार लाख भरायला सांगण्यात आले. माने यांनी कर्ज काढून चार लाख भरले. त्यानंतर क्युनेट नावाच्या व्यवसायाद्वारे विविध वस्तू घेऊन त्याची संकेतस्थळावरून विक्री केली जाईल, असे सांगण्यात आले. त्यासाठी एक लॉगिन आयडी आणि पासवर्डही देण्यात आला. त्यांना अन्य सभासद तयार करण्यास सांगून सभासदांकडून आलेले पैसे कंपनीच्या खात्यावर भरायला लावले.माने यांना युरोपात नेल्याचा खर्च त्यांच्या रकमेमधून करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. दरम्यान अशा प्रकारे फसवणूक केली जात असल्याचे त्यांना समजले. त्यांनी वाधवानीकडे सर्वांचे पैसे परत करण्याची मागणी केली. त्याने पैसे परत देण्यास नकार दिला. याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. सायबर सेलच्या पोलिसांनी चौघांना अटक केली. (प्रतिनिधी)सिस्टीम हॅक करून वापरले ११ वर्षांचे इंटरनेट४एका कंपनीची सिस्टीम हॅक करून बेकायदेशीरपणे तब्बल ११ वर्षांचे इंटरनेट एकाच वर्षात वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर सेलच्या पोलिसांनी जाहीद मंहमद हनिफ शेख (वय २५, रा. भवानी पेठ) आणि समीर ऊर्फ समशेर इब्राहिम पठाण (वय वय ३०, रा. गंज पेठ) या दोघांना अटक केली आहे. ४याप्रकरणी इंटर मेडिया केबल कम्युनिकेशन कंपनीचे शामसुंदर पप्पू (वय ५२, रा. नानकनगर, कोंढवा खुर्द) यांनी तक्रार दिली आहे. पठाण याच कंपनीमध्ये नोकरीला आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून शेख याने कंपनीची सिस्टीम हॅक केली. विविध प्रॉक्सी मॅक तयार केले. डिसेंबर १५ ते डिसेंबर १६ या कालावधीत त्यांनी कंपनीचे इंटरनेट चोरुन वायफाय रुम तयार केली होती. नागरिकांकडून पैसे घेऊन त्यांना इंटरनेटचा वापर करू दिला जात होता.