शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

शहरात दोन ग्रेडसेपरेटरसाठी २८ कोटींच्या खर्चाला मान्यता

By admin | Updated: June 1, 2017 02:24 IST

शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ३५ कोटी ६० लाख ९२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ३५ कोटी ६० लाख ९२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामध्ये रहाटणी परिसरात दोन ग्रेडसेपरेटर उभारण्यासही मंजुरी देण्यात आली.स्थायी समिती सभागृहात बुधवारी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस रस्त्यावर साई चौक (जगताप डेअरी) रहाटणी येथे दोन समांतर विलगक (ग्रेडसेपरेटर) बांधण्यासाठी येणाऱ्या सुमारे २८ कोटी ३६ लाख ९१ हजार रुपयांच्या, महापालिकेच्या जोतिबा उद्यान देखभाल संरक्षण करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ३३ लाख ९६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.आरोग्य विभागास ४.५ घनमीटर क्षमतेचे बीन्स कंटेनर खरेदी करण्यासाठी सुमारे १ कोटी ७५ लाख ९५ हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्रमांक १६ मधील नाल्याची कामे अंतर्गत नाल्याच्या भिंतीची उंची वाढवणे व जाळ्या बसविण्यासाठी येणाऱ्या सुमारे ३० लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.खराळवाडी येथील आरक्षण क्रमांक १०२ व १०३ येथे उद्यान विकसित करण्यासाठी १ कोटी ८० लाख ९७ हजार रुपये खर्चाचा विषय स्थायी समितीच्या या बैठकीत मंजूर झाला. सांगवी परिसरात नवीन मुख्य वितरण नलिका टाकण्यासाठी येणाऱ्या सुमारे २५ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जुनी सांगवी पाणी पुरवठ्यासाठी परिसरात नवीन मुख्य वितरण नलिका टाकण्यासाठी येणाऱ्या सुमारे २४ लाख ८७ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर २३ येथील वीजभार वाढविण्याकरिता २२ के. व्ही. फीडरसाठी सुमारे ३८ लाख ६१ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.कर्मचाऱ्यांकरिता गणवेश खरेदीपांजरपोळ नवीन टाकी ते चक्रपाणी वसाहत मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी ५८ लाख २३ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. गवळीनगरमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी ३८ लाख ४० हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या या बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकरिता गणवेश कापड खरेदीसाठी १ कोटी १ लाख ९० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.