शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

कंपनीवरचा दरोडा फसला

By admin | Updated: September 15, 2014 05:19 IST

चाकण औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीवर रविवारी सकाळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला आंबेठाण ग्रामस्थांच्या सहकार्याने चाकण पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केले

आंबेठाण : चाकण औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीवर रविवारी सकाळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला आंबेठाण ग्रामस्थांच्या सहकार्याने चाकण पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केले. त्यांच्याकडून कटावणी, कोयता, चॉपर आदी घातक शस्त्रे जप्त केली आहेत.रेहान हसन सय्यद (१९ , रा. महाजन आळी, जुन्नर), स्वप्निल पंढरीनाथ केदार (२०, रा.धालेवाडी, जुन्नर), नवराज सय्यद (२२, रा. बाराव, ता.जुन्नर), अमोल दिगंबर बांगर (२०, रा.पिंपळगाव सिद्धनाथ, ता.जुन्नर) व एक अल्पवयीन मुलगा अशी अटक करण्यात आलेल्या पाच चोरट्यांची नावे आहेत. पोलीस शिपाई सुनील सोपानराव नरके (वय ४३ वर्षे, रा.चाकण) यांनी या घटनेची खबर चाकण पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आंबेठाण (ता.खेड) गावाच्या हद्दीत अवजड वाहनांचे सुटे भाग तयार करणारी महिंद्रा फोर्जिंग ही कंपनी आहे. या कंपनीवर हे चोरटे दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. याची कुणकुण पोलिसांना लागली असता, त्यांनी आंबेठाण ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलीस निरीक्षक दगडू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राम मुंडे, पोलीस शिपाई सुनील नरके, पोलीस हवालदार अय्याज शेख, अनिल ढेकणे, अनंता शिंदे व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी सापळा लावला. चोरटे कंपनीत घुसून दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांना चाकण पोलीस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखविताच ते पोपटासारखे बोलू लागले. त्यांच्याजवळील १९ इंच लांब असलेली काळ्या रंगाची लोखंडी कटावणी, कोयता, चॉपर, लोखंडी पक्कड, लाल रंगाची मोटारसायकल आदी साहित्य हस्तगत केले. (वार्ताहर)