शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेकडून रस्ते खोदाई झालीच नाही!

By admin | Updated: May 10, 2015 05:10 IST

विधी महाविद्यालय रस्ता परिसरातील अशोक पथ येथे शुक्रवारी (दि. ८) भरदिवसा महावितरणकडून खोदाई करून केबल टाकली असतानाही

पुणे : विधी महाविद्यालय रस्ता परिसरातील अशोक पथ येथे शुक्रवारी (दि. ८) भरदिवसा महावितरणकडून खोदाई करून केबल टाकली असतानाही, त्या ठिकाणी खोदाईच झाली नसल्याचा धक्कादायक खुलासा महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याने (जेई) वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केला आहे. त्यामुळे या अभियंत्याने नेमकी कशाची पाहणी केली आणि ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा अट्टहास का केला जात आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात गेल्या काही महिन्यांत खासगी केबल कंपन्या, महावितरण, बीएसएनएल, तसेच एमएनजीएल कडून बेसुमार रस्ते खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात जणू काही रस्ते खोदाईची स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत मागील महिन्यात महापौरासंह, स्थायी समिती अध्यक्ष, शहराचे खासदार, सभागृह नेते, महापालिका आयुक्तांनी स्वतंत्र बैठका घेऊन १ मेनंतर पाणीपुरवठा आणि ड्रेनेज वगळता कोणत्याही प्रकारची खोदाई शहरात करण्यात येणार नसल्याचे आदेश दिले. त्यानुसार, महापालिका आयुक्तांनीही पथ विभागास हे आदेश दिले आहेत. हे आदेश देऊन एका आठवड्याचा कालावधीही उलटला नसतानाच अशोक पथ येथे महावितरणकडून शुक्रवारी दिवसभर खोदाई सुरू होती. या वेळी काही कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी आपल्यास याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री उशिरा पथ विभागाकडून एका कनिष्ठ अभियंत्यास या प्रकाराची माहिती घेण्याच्या सूचना कार्यकारी अभियंते संतोष तांदळे यांनी दिल्या. त्या नंतर या कनिष्ठ अभियंत्याने संबंधित जागेची पाहणी करून धक्कादायक खुलासा वरिष्ठांकडे केला आहे.या कामास परवानगी देण्यात आली असून, हे काम ३0 एप्रिलपूर्वीच करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी काहीच नसल्याची माहिती आपल्याला दिली असल्याचे तांदळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.