शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गॅसवाहिनीसाठी रस्ताच कापला

By admin | Updated: September 15, 2014 23:23 IST

शासनाचे रस्ता सुरक्षाविषयी असणारे सर्व नियम धाब्यावर बसवत गॅसवाहिनीसाठी रस्ताच कापला जात आहे. बिरदवडी (ता. खेड) येथे हा प्रकार सुरू आहे.

आंबेठाण : शासनाचे रस्ता सुरक्षाविषयी असणारे सर्व नियम धाब्यावर बसवत गॅसवाहिनीसाठी रस्ताच कापला जात आहे. बिरदवडी (ता. खेड) येथे हा प्रकार सुरू आहे. यामुळे अपघात वाढले असून, रविवारी भाम बाजूकडून बिरदवडीकडे जाणारी कार साईडपट्टीचा अंदाज न आल्याने या खोदकामात जाऊन पलटी झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
चाकण ते उरण असे गॅसवाहिनीचे काम सध्या सुरू आहे. त्या कामाची सुरुवात चाकणजवळील रोहकल फाटा येथून करण्यात आली. तसेच, या कामाचा काही भाग आंबेठाण आणि वराळे येथे सुरू आहे. 
उरण येथून गॅस आणून तो चाकण आणि शिक्रापूर येथे वितरीत केला जाणार असल्याचे येथील कर्मचारीवर्गाने सांगितले. एचपीसीएल  या कंपनीकडून हे काम 
कल्पतरू ट्रान्समिशन पॉवर लिमिटेड या कंपनीने घेतले आहे. 
बिरदवडी परिसरात काम सुरू असताना वाहतूककोंडी होत आहे. नागरिकांना याचा त्नास करावा लागत आहे. बिरदवडी ते भाम हा राजगुरुनगरला जाण्यासाठी जवळचा आणि पर्यायी मार्ग आहे. 
परंतु, या ठिकाणी हे काम सुरू असल्याने अनेक अडचणी येत आहेत. या मार्गावर पाईप खाली करणारे ट्रक, खोदकाम करणारे जेसीबी, वेल्डिंग करणारे  मशीन आणि इतर साहित्य असल्याने वाहतूककोंडी होत असून, रस्त्याचे नुकसान होत आहे.
मागील 4 ते 5 महिन्यांत वराळे गावाकडे जाणारा रस्ता जवळपास तीन वेळा खोदण्यात आला. 
वारंवार रस्ता आणि साईडपट्ट्या खोदल्या जात असल्याने त्यांची चाळण होत आहे. 
अधिकारी मात्न डोळे उघडे ठेवून हे सर्व पाहत आहे. या दोन्ही ठिकाणी म्हणजे आंबेठाण आणि बिरदवडी  परिसरात रस्ता अतिशय खराब आहे आणि त्यात तो अजून खराब होत असल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवासी कात्नीत सापडला आहे. (वार्ताहर)
 
अपघाताला निमंत्नण
रविवारी या ठिकाणी भाम बाजूकडून बिरदवडीकडे जाणारी मारुती कार रस्त्याच्या साईडपट्टीचा अंदाज न आल्याने ओढय़ात जाऊन पलटी झाली. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नसून गाडीचे मात्न नुकसान झाले आहे. रोहकल ग्रामस्थांनी हे काम बंद केले आहे. हे काम असेच सुरू राहिले तर आंदोलनाची भाषा ग्रामस्थ करीत आहेत. 
अधिका:यांचा अंकुश नाही
रस्ता खोदाई करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर हे काम नियमानुसार सुरू आहे की नाही, हे पाहण्याचे कामदेखील अधिकारी करीत नाही, असे चित्न आहे. वराळे आणि आंबेठाण परिसरात काही सूचना देऊनही येथे काम करणा:या कर्मचा:यांनी त्या धुडकावून लावल्या. त्यामुळे या नियमबाह्य कामावर अधिकारीवर्गाचा अंकुश नसल्याचे स्पष्ट होते.
 
4अगदी डांबरी रस्त्यालगत खोदकाम केले जात आहे. अनेक ठिकाणी तर मुख्य साईडपट्टय़ा खोदून पाईप गाडले जात आहेत. या ठिकाणी काही रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या ताब्यात आहे. परंतु, आधीच खराब असणारा हा रस्ता पुन्हा खोदकाम केले जात असल्याने जास्तच खराब होत आहे.
4या रस्त्याला साईडपट्टी आणि गटारे तर राहिलेलीच नाहीत. खोदकाम करताना निघालेला राडारोडा तसाच पडत असून, त्यामुळे गटाराच्या पाण्याची दिशा बदलत आहे. काही ठिकाणी तर पाणी शेतक:यांच्या शेतातून जाते.
4अनेक ठिकाणी तर रस्ता उकरल्यानंतर तो पुन्हा गाडल्यानंतर अनेक ठिकाणी खचत असून, या ठिकाणी मोठय़ा चिरा पडल्या आहेत. या ठिकाणी पुन्हा भरावासाठी मुरूम न टाकता त्या ठिकाणी माती टाकली जात असल्याने वाहने खचण्याचे प्रमाण वाढत आहेत.