शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

रस्तेखोदाई सुरूच; प्रशासनाची नामुष्की

By admin | Updated: May 9, 2015 03:26 IST

महापालिकेने बंदी करूनही महावितरणकडून विधी महाविद्यालय रस्ता येथील अशोकपथच्या परिसरात रस्ते खोदाई सुरूच आहे.

पुणे : महापालिकेने बंदी करूनही महावितरणकडून विधी महाविद्यालय रस्ता येथील अशोकपथच्या परिसरात रस्ते खोदाई सुरूच आहे. विशेष म्हणजे या प्रकाराबाबत पथ विभागास माहिती दिल्यानंतर पथ विभागाच्या प्रमुखांनी याची दखल घेण्याऐवजी आपण त्या परिसरातील अधिकाऱ्यांशी बोला, अशी भूमिका घेत जबाबदारी टाळण्याचाच प्रयत्न केला आहे. त्यामुळे एकीकडे पावसाळयापूर्वी शहरातील रस्ते पूर्ववत करण्याचा महापालिका प्रशासनाचा दावा फोल ठरल्याचे दिसून येत आहे. तर याबाबत माहिती देऊनही शुक्रवारी दिवसभर शहरात गेल्या काही महिन्यांत खासगी केबल कंपन्या, महावितरण, बीएसएनएल तसेच एमएनजीएलकडून बेसुमार रस्तेखोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात जणू काही रस्ते खोदाईची स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत मागील महिन्यात महापौरासंह, स्थायी समिती अध्यक्ष, शहराचे खासदार, सभागृह नेते, महापालिका आयुक्तांनी स्वतंत्र बैठका घेऊन १ मे नंतर पाणी पुरवठा आणि ड्रेनेज वगळता कोणत्याही प्रकारची खोदाई शहरात करण्यात येणार नसल्याचे आदेश दिले. त्यानुसार, महापालिका आयुक्तांनीही पथ विभागास हे आदेश दिले आहेत. मात्र, अशोकपथ येथे महावितरणकडून शुक्रवारी दिवसभर खोदाई सुरू होती. या वेळी काही कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी आपल्यास याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.