शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो, आले, फ्लॉवर, कोबीच्या भावात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:08 IST

पुणे : मार्केट यार्डातील बाजारात रविवारी (दि. २५) आले, टोमॅटो, कोबी आणि फ्लॉवरच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ ...

पुणे : मार्केट यार्डातील बाजारात रविवारी (दि. २५) आले, टोमॅटो, कोबी आणि फ्लॉवरच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर काकडी, शिमला मिरची, घेवडा, कारली आणि दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने भावात घट झाली आहे. इतर सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत पावसामुळे रविवारी भाजीपाल्याच्या आवकेमध्ये घट झाली आहे.

फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत घटली आहे़. रविवारी मार्केट यार्डात ८० ते ९० गाड्यांची आवक झाली. इतर राज्यातून आलेल्या मालात गुजरात आणि कर्नाटकातून २ ते ३ टेम्पो कोबी, मध्य प्रदेश येथून ६ टेम्पो गाजर, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ५ ते ६ टेम्पो शेवगा, आग्रा, इंदूर आणि गुजरातमधून बटाट्याची ३० ते ३५ ट्रक, तर मध्यप्रदेश आणि गुजरातधून ७ ते ८ ट्रक लसूण इतकी आवक झाली आहे.

राज्यातील वेगवेगळ्या भागांतून आलेल्या मालामध्ये आवकेमध्ये कोबी सुमारे ८ ते १० टेम्पो, प्लॉवर ८ ते १० टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, सातारी आले ७०० ते ८०० गोणी, गवार ७ ते ८ टेम्पो, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो ६ ते ७ हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, पावटा ४ ते ५ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, पुरंदर, पारनेर वाई आणि साताऱ्याहून मटार १ हजार ते १२०० गोणी, कांदा ५० ट्रक, भुईमुग शेंग १५० पोती इतकी आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :

कांदा : १५०-२००, बटाटा : १००-१५०, लसूण : ३००-१०००, आले : सातारी १५०-२५०, भेंडी : १५०-२००, गवार

: २००-३००, टोमॅटो : १००-१५०, दोडका : १००-२००, हिरवी मिरची : २००-३५०, दुधी भोपळा: १००-१२०, चवळी :

१५०- २००, काकडी : ८०-१००, कारली हिरवी १५०-२००, पांढरी १००-१५०, पापडी : १००-१५०, पडवळ :

१५०-१६०, प्लॉवर: १००-१४०, कोबी : १००-१४०, वांगी : १००-२००, ढोबळी मिरची : १००-२००, तोंडली : कळी २००-२५०, जाड, १००-१२०, शेवगा : २००-३००, गाजर २००-२५०, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : १००-१२०, वालवर २००-३००, बीट: ६०-८०, घेवडा : ३५०-४००, कोहळा : १००-१२०, आर्वी : २००- २५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२५०, भुईमुग शेंग : ३००-३५०, मटार: स्थानिक: ४५०-५००, पावटा: २००-२५०, तांबडा भोपळा : ६०-१००, मका कणीस : ६०-१००, सुरण : १६०-१८०, नारळ : शेकडा १०००-१६००.

-------------------------------

फोटो : मार्केट यार्डात रविवारी ढोबळी मिरची, हिरवी मिरची, गवार, आले, वॉल आदींची झालेली आवक.

(फोटो : जेएम एडिटवर पाठवले आहे. १) ढोबळी मिरची, २) हिरवी मिरची, ३) गवार, ४) आले आणि ५) वॉल)