शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

दौंडमध्ये दंगल

By admin | Updated: April 16, 2015 23:02 IST

शहरात दोन गटांत बुधवारी सायंकाळी दंगल झाली. यात एका पोलिसासह तीन युवक जखमी झाले आहेत. दोन्ही गटांतील सुमारे ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दौंड : शहरात दोन गटांत बुधवारी सायंकाळी दंगल झाली. यात एका पोलिसासह तीन युवक जखमी झाले आहेत. दोन्ही गटांतील सुमारे ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परस्परविरोधी तक्रार दिली असून संशयित म्हणून ७ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दंगल, बेकायदा शस्त्र बाळगणे, विनयभंग यासह अन्य गुन्हे दाखल केले असल्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी सांगितले. दगडफेकीत जगदीश चौदर हा पोलीस जवान जखमी झाला. अशोक सोनोने, राजू वीरु, पप्पू सोनवणे (तिघेही राहणार भीमनगर, दौंड) हे तीन युवक जखमी झाले आहेत.बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमाराला दोन गट रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ समोरासमोर आले. अचानक दोन गटांत दंगल उसळल्याने गावात तणावाचे वातावरण होते. राज्य राखीव पोलीस बलाची तुकडी तैनात करण्यात आली होती. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. दंगलीतील दोन्ही गटाला आवरण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. अर्धा तास हा प्रकार सुरू होता. दंगलीचे लोण शहरात पसरल्यानंतर जनजीवन विस्कळीत झाले. नागरिक सैरावैरा धावत होते. दरम्यान, रात्री उशिराने शहरातील परिस्थिती हळूहळू निवळली होती. गुरुवारी मात्र, परिस्थिती पूर्वपदावर आली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि पोलीस जवानांनी भेट दिली. किशोर वाघमारे, करण वाल्मीकी, प्रभाकर पोते, बबलू पोते, संतोष साळवे, रवींद्र झोझे, संजू वाल्मीकी (सर्व रा. दौंड) यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस जवान जगदीश चौदर यांनी तिसरी फिर्याद दिली आहे. (वार्ताहर) परस्परविरोधी तक्रारीदौंड पोलिसांना नरेश वाल्मीकी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवार (दि. १४) रोजी दोन कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. नंतर हे प्रकरण मिटले होते. परंतु बुधवार (दि. १५) रोजी ५० ते ६० कार्यकर्ते रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ वाल्मीकीनगर येथे लोखंडी पाईप, तलवार, लाकडी दांडके घेऊन घरात घुसले आणि मारहाण केली. महिलांचा विनयभंगदेखील केला. अन्य दुसऱ्या तक्रारीत अशोक सोनवणे यांनी म्हटले आहे की, मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता मी शालिमार येथे गेलो होतो. या ठिकाणी मला मित्र भेटले. मी परत येत असताना मंगळवारी झालेल्या भांडणाच्या कारणावरून येथील रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ २० ते २५ जणांनी मला व माझ्या मित्रांना हॉकी, पाईप आणि तलवारीने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.