कोरोनाच्या संकट कालावधीमध्ये अनेक जण मदतीचा हात पुढे देत होते. याचदरम्यान रिक्षाचालक असलेल्या संदीप काळे यांनी आजारी नागरिकांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठीची मदत सातत्याने केली. सुमारे ६०० हून अधिक नागरिकांना या संकेत कालावधीमध्ये रिक्षा उपलब्ध करून देता दवाखाना कार्यालय तसेच हॉस्पिटल्सपर्यंत मोफत पोहोचवण्याचे काम काळे करत होते.
उदरनिर्वाहाचे रिक्षा हेच साधन असल्याने ते आपल्या कामावर खरंच सामाजिक कर्तव्यदेखील बजावत होते. याची नोंद घेऊन आम्ही वारकरी या संस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी सचिन पवार, संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा दिंडी समाज अध्यक्ष मारुती कोकाटे, बाळासाहेब वांजळे, राजाभाऊ थोरात, पोपट बराटे, अनंत सुतार, संजय बोरगे, बाळासाहेब सुतार, संतोष वेल्हाळ आदी उपस्थित होते.
संकट कालावधीमध्ये मोठी मदत ज्याप्रमाणे आवश्यक असते त्याचप्रमाणे सर्वसामान्य लोकांच्या मदतीचीही गरजही महत्त्वपूर्ण ठरते. रिक्षाचालकांचे काम या संकट कालावधीमध्ये विसरता येणार नाही नाही, असे या वेळी संतसेवक मारुती कोकाटे यांनी सांगितले.