शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

भाच्याच्या खुनाचा मामाने घेतला बदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आंबेगाव पठार येथे झालेल्या आपल्या भाच्याच्या खुनाचा बदला मामाने एका अल्पवयीन मुलाचा खून करून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आंबेगाव पठार येथे झालेल्या आपल्या भाच्याच्या खुनाचा बदला मामाने एका अल्पवयीन मुलाचा खून करून घेतला. पर्वती पायथा येथे रविवारी रात्री झालेल्या खुनाचे प्रकरण दत्तवाडी पोलिसांनी उघडकीस आणले असून, त्यात सहा जणांना अटक केली आहे.

सौरभ विनोद वीर ऊर्फ मोन्या, अक्षय विनोद वीर, वृषभ दत्तात्रय रेणुसे, सचिन ऊर्फ दादा पवार, आकाश नावाडे, स्वामी कांबळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सौरभ वाघमारे (वय १७, रा. जनता वसाहत) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

याप्रकरणी दादासो मारुती बनसोडे (वय २३, रा. लक्ष्मी कॉलनी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

सौरभ वाघमारे याने आंबेगाव पठार येथे एप्रिल महिन्यात संग्राम लेकावळे याचा खून केला होता. त्यानंतर सौरभ हा आंबेगाव पठार सोडून जनता वसाहतीत राहायला आला. संग्राम याचा मामा वृषभ रेणुसे याने इतरांच्या मदतीने वाघमारे याच्या खुनाचा कट रचला. सौरभ याला जुना मोबाईल विक्री करण्याचा बहाणा करून रविवारी रात्री पर्वती पायथा येथे बोलावून घेतले. त्यानुसार सौरभ हा बनसोडे याला घेऊन पर्वती पायथा येथे आला. तो पायऱ्यांवर थांबला असताना तेथे दबा धरून बसलेले सौरभ वीर, अक्षय वीर व वृषभ रेणुसे यांनी त्यांच्याकडील कोयत्याने सौरभ वाघमारे याच्या डोक्यावर, पाठीवर व हातावर वार केले. इतरांनी सौरभला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बनसोडे हा त्याला वाचविण्यासाठी सौरभला मारू नका, तो मरेल, असे ओरडत असताना सौरभ वीर याने त्याच्या पाठीवर कोयत्याने वार केला, तर स्वामी कांबळे याने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

हा प्रकार सुरू असताना लोकांची गर्दी जमली. तेव्हा आरोपींनी नागरिकांना इथून निघून जा नाही तर तुम्हालाही मारून टाकू, अशी धमकी दिली. सौरभ हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर टोळके निघून गेले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यापैकी ६ जणांना अटक केल्याचे दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता इंदलकर यांनी सांगितले.

खुनाचा बदला खून

सौरभ वाघमारे आणि संग्राम लेकावळे हे दोघेही आंबेगाव पठार येथे राहत होते़ सौरभ हा लहान असल्याने संग्राम हा त्याला किरकोळ कामे सांगत तसेच येता जाता त्याची चेष्टा करून डोक्यात टपली मारत होता. त्याचा राग आल्याने सौरभने साथीदारांच्या मदतीने एप्रिल महिन्यात संग्राम याचा खून केला होता़ या प्रकरणानंतर सौरभ हा जनता वसाहतीत राहायला आला होता़ संग्रामचा मामा वृषभ रेणुसे याने भाच्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कट रचून सौरभ वाघमारे याचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.