शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

दुबार मतदारांना निवडणूक आयोगाचा लगाम

By admin | Updated: January 13, 2017 03:05 IST

महापालिका व जिल्हा परिषद दोन्ही ठिकाणी मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल साडेसहा लाख दुबार मतदारांना राज्य

पुणे : महापालिका व जिल्हा परिषद दोन्ही ठिकाणी मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल साडेसहा लाख दुबार मतदारांना राज्य निवडणूक आयोगाने चांगलाच लगाम घातला आहे. या वेळी प्रथमच जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीसाठी एकाच दिवशी २३ फेबु्रवारी रोजी मतदान होणार असल्याने या दुबार मतदारांना जिल्हा परिषद अथवा महापालिका एकाच ठिकाणी मतदान करता येईल.राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकाच दिवशी मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागातही मतदार यादीत नाव असणाऱ्या मतदारांची संख्या खूप मोठी आहे. यातील अनेक मतदारांची नावे राजकीय सोयीसाठी दोन्ही ठिकाणी नोंदविण्यात आली आहेत. शहर आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी नाव असलेल्या मतदारांची संख्या लाखांच्या घरात असल्याचे निवडणूक कार्यालयाकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेनुसार मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यातील दुबार नावे मोठ्या प्रमाणात कोथरूड, सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज परिसरात आहेत. पुरंदर आणि दौंडमधील नावांचा समावेश हडपसर आणि कोंढवा परिसरात आहेत. वडगावशेरी, खराडी, चंदननगरमध्ये मोठ्या प्रमाणात शिरूर आणि हवेली तालुक्यंतील मतदारांची दुबार नावे आहेत. जुन्नर, खेड आणि आंबेगाव या तालुक्यांतील मतदार भोसरी, पिंपरी-चिंचवड परिसरात आढळून येतात.निवडणूक कार्यालयाच्या वतीने नुकत्याच करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यात तब्बल साडेसहा लाख मतदार दुबार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही दुबार नावे कमी करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने ही नावे कायम आहेत. (प्रतिनिधी) जिल्ह्यात आतापर्यंत नेहमी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांच्या मतदानाच्या तारखांमध्ये किमान १० ते १५ दिवसांचे अंतर होते. त्यामुळे दुबार नाव असणारे अनेक मतदार नेहमीच दोन्ही ठिकाणी मतदान करीत असल्याचा अनुभव आहे. परंतु, दुबार मतदारांच्या दोन्ही ठिकाणी मतदान करण्याला निवडणूक आयोगाने चांगला लगाम लावला आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी काही जणांकडून यासाठी विशेष ‘तयारी’ केली जाते, अशा तक्रारीही झाल्या होत्या. खास रेशनकार्ड आणि ओळखीचे पुरावे बनवून त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मतदारांकडून मतदान करून घेतले जायचे.