शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

महापौर चषकात ‘राष्ट्रकुल’ची पुनरावृत्ती

By admin | Updated: December 17, 2014 05:30 IST

महापालिकेकडून भरविण्यात येणाऱ्या यंदाच्या महापौर चषक क्रीडा स्पर्धा आयोजनापूर्वीच वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.

पुणे : महापालिकेकडून भरविण्यात येणाऱ्या यंदाच्या महापौर चषक क्रीडा स्पर्धा आयोजनापूर्वीच वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. या स्पर्धेसाठीच्या २ कोटी ४४ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली आहे. मात्र, ही मान्यता देताना, स्पर्धांच्या आयोजनासाठी नेमण्यात आलेल्या मान्यताप्राप्त क्रीडा संस्थांनी सादर केलेल्या अव्वाच्या सव्वा बिलांची रक्कम पाहण्याची तसदीही स्थायी समितीने न घेतल्याने पालिकेच्या लाखो रुपयांवर हात साफ केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी गाजलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या भ्रष्टाचाराची पुनरावृत्ती महापालिका नक्कीच करणार, अशी चर्चा पालिकेत रंगली आहे. महापालिकेच्या वतीने दर वर्षी महापौर चषक क्रीडा स्पर्धेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. २०१४-१५ या वर्षाच्या क्रीडा स्पर्धेंतर्गत तब्बल २६ स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धांसाठी तब्बल २ कोटी ४४ लाख रुपयांच्या खर्चास मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या मान्यतेनुसार, अवघा ६९ लाखांचा खर्च हा खेळांडूच्या बक्षिसांवर होणार असून, उर्वरित १ कोटी ७५ लाखांचा खर्च स्पर्धांच्या आयोजनांवर केला जाणार आहे. वेगवेगळ्या क्रीडा संस्थांमार्फत या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. त्यानुसार संबंधित संस्थांनी प्रत्येक स्पर्धेसाठी लागणाऱ्याची खर्चाची आकडेवारी प्रशासनाकडे सादर केली होती. त्यास मान्यता दिली असल्याचे समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, वेगवेगळ्या कामाचा खर्च मात्र डोंगराएवढा आहे. (प्रतिनिधी)