शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वीजनिर्मिती दूरच; पण कचरा जिरविण्याचा उद्देश

By admin | Updated: May 6, 2017 02:45 IST

कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरात २५ प्रकल्प सुरू केले. यांपैकी केवळ १९ प्रकल्पच

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरात २५ प्रकल्प सुरू केले. यांपैकी केवळ १९ प्रकल्पच सुरू आहेत. यात वीजनिर्मिती करण्याऐवजी शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी शक्य तेवढा कचरा जिरविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे.कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील विविध भागांत २५ प्रकल्प उभारले आहेत. यासाठी सुमारे १६ कोटी रुपये खर्च करण्यात आला असून, देखभाल-दुरुस्तीसाठीही दर वर्षी दीड कोटी रुपयांचा खर्च केला जातो. तरीही, यातील ६ प्रकल्प सध्या बंद पडले असून, अन्य प्रकल्प ७० ते ८० टक्के क्षमतेनेच सुरू आहेत. या प्रकल्पाचे नूतनीकरण केल्यास अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते; परंतु कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यापेक्षा शहरातील जास्तीत जास्त ओला कचरा या प्रकल्पांमध्ये जिरविण्याचा प्रयत्न सुरू आहेत. यामुळे ज्या उद्देशाने प्रकल्प सुरू केले, त्यालाच हरताळ फासला जात आहे.ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणे, या प्रमुख उद्देशाने हे २५ प्रकल्प सुरू करण्यात आले. या प्रत्येक प्रकल्पाची सरासरी ५ टन कचऱ्याची क्षमता आहे. महापालिकेच्या हद्दीत निर्माण होणारा कचरा जिरविणे आणि त्यापासून महापालिकेलादेखील फायदा होण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून हे प्रकल्प उभारण्यात आले. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कात्रज, घोले रोड, म्हाडा कॉलनी येरवडा, रेल्वे म्युझियम कात्रज येथील पाच प्रकल्प पूर्णपणे बंद आहेत. शहरातील या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये १२५ टन कचरा जिरविण्याची क्षमत असताना सध्या ७० ते ८० टनच कचरा जिरवला जात आहे.  सध्या सुरू असलेल्या १९ प्रकल्पांमध्ये ३० क्युबिक मीटर गॅसनिर्मिती होत असून, केवळ ३ ते ४ किलोवॉट वीजनिर्मिती होत आहे. या प्रकल्पांमधून निर्माण होणारी वीज महापालिकेच्या पथदिव्यासाठी वापरली जाते. यासाठी वीजनिर्मितीचे प्रकल्प रात्री सुरू ठेवावे लागतात. यासाठी जनरेटरचा रात्री खूप आवाज होत असल्याने नागरिकांकडून प्रकल्पांना विरोध होत असल्याने वीजनिर्मितीमध्ये अडथळा येत असल्याचे अधिकृत सूत्रांंनी सांगितले.