शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सक्तीमुळेच ‘आधार’ची आठवण

By admin | Updated: April 25, 2015 05:12 IST

सध्या शहराच्या विविध भागांतील १७ केंद्रांवर आधार नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत ८०.४३ टक्के नागरिकांनी नोंदणी केली आहे. विविध शासकीय कामकाजासाठी

मंगेश पांडे, पिंपरी सध्या शहराच्या विविध भागांतील १७ केंद्रांवर आधार नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत ८०.४३ टक्के नागरिकांनी नोंदणी केली आहे. विविध शासकीय कामकाजासाठी पुन्हा ‘आधार कार्ड’ची सक्ती केली जाऊ लागल्याने २ महिन्यांपासून ओस पडलेल्या केंद्रांवर गर्दी दिसत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आधार नोंदणीचा पहिला टप्पा २० जानेवारी २०११ ते १६ फेबु्रवारी २०१२ दरम्यान राबविण्यात आला. यामध्ये ५ लाख ५ हजार ४७ जणांची नोंदणी करण्यात आली, तर १९ जून २०१२ पासून नोंदणीचा दुसरा टप्पा सुरू केला. या अंतर्गत अद्यापपर्यंत १३ लाख ८९ हजार ६८४ जणांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. काही दिवसांपूर्वी आधार नोंदणीला प्रतिसाद मिळत नसल्याने या कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या संबंधित कंपनीने शहरातील काही ठिकाणचे आधार नोंदणी केंद्र बंद केले. शासकीय कामकाजासाठी आधार कार्ड बंधनकारक असल्याचे सांगितले जाईल, त्याच वेळी नोंदणीला प्रतिसाद मिळतो. मात्र, इतर वेळी नोंदणीला प्रतिसाद मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. दरम्यान, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महा ई-सेवा केंद्रात आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली. या केंद्रातही हवा तितका प्रतिसाद मिळत नव्हता. दरम्यान, पुन्हा विविध शासकीय कामकाजासाठी आधार कार्ड आवश्यक असल्याचे संबंधित यंत्रणेकडून सांगितले जाऊ लागल्याने नागरिक आधार नोंदणी केंद्रात येऊ लागले आहेत. मतदारनोंदणी, घरगुती गॅसजोड, शिधापत्रिका, विविध दाखले यासाठी आधारची गरज भासत आहे.