शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

कारकस प्रकल्पासाठी ५० वेळा स्मरणपत्रे...

By admin | Updated: June 17, 2014 02:18 IST

महापालिकेने मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी कारकस प्रकल्प उभारला आहे. मात्र, पर्यावरण विभागाने आक्षेप घेतल्याने प्रकल्प बंद आहे

पुणे : महापालिकेने मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी कारकस प्रकल्प उभारला आहे. मात्र, पर्यावरण विभागाने आक्षेप घेतल्याने प्रकल्प बंद आहे. प्रकल्प सुरू करण्याविषयी आतापर्यंत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ५० वेळा पत्र दिले. प्रत्येक पत्रामध्ये पूर्वीच्या पत्राचा उल्लेख केला. मात्र, मुख्यमंत्र्यांकडे हा विषय प्रलंबित आहे, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान केले. महापालिकेच्या महात्मा फुले सभागृहातील व्हिडोओ कॉन्फरन्सचे उद्घाटन सुळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी महापौर चंचला कोद्रे, स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे, आयुक्त विकास देशमुख व नगरसेवक उपस्थित होते. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा आढावा सुळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, ‘‘शहरातील कचरा व्यवस्थापनाचा विषय महत्त्वाचा आहे. महापालिकेतर्फे पाच ठिकाणी कचराप्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार होते. मात्र, अद्याप दोनच जागा ताब्यात आल्या असून, त्याठिकाणी प्रकल्प उभारण्याची कार्यवाही तातडीने करण्याची गरज आहे. शहरातील सर्वाधिक कचरा उरुळी देवाची व फुरसुंगी येथे डंपिंग केला जातो. त्याठिकाणी असलेला हंजर प्रकल्प वारंवार बंद पडतो. त्यामुळे ग्रामस्थ आंदोलन करतात. महापालिकेने कचरा प्रकल्पासाठी पाच जागांची पाहणी केली. मात्र, त्यापैकी दोन जागा ताब्यात आल्या असून, उर्वरित तीन जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे. पुढील २० महिन्यांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून कचऱ्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे, असे सुळे यांनी सांगितले. सिंचन घोटाळा, एलबीटी आणि पाणी या विषयांवरही पक्ष पातळीवर निर्णय होत असल्याचे सांगत थेट उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला. (प्रतिनिधी)