शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

उरले फक्त ९.६२ टक्के पाणी

By admin | Updated: May 31, 2016 02:23 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत अवघा ९.६२ टक्के (२.८० टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत अवघा ९.६२ टक्के (२.८० टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी याच कालावधील तब्बल १५.३८ टक्के (४.४८ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी असल्याने तसेच जूनअखेरीस पालखी सोहळ्यासाठी पाणी सोडावे लागणार असल्याने महापालिकेसमोरील अडचणी वाढल्या असून, जून महिन्यात पावसाला सुरुवात न झाल्यास शहरातील पाणीकपात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पालिकेकडूनही कपातीबाबत विचार सुरू करण्यात आला असून, जून महिन्यातील पावसाची स्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पातळी मेअखेरीस अवघ्या ९.६२ टक्क्यांवर आली आहे. या प्रकल्पात पानशेत, खडकवासला, वरसगाव आणि टेमघर ही ४ धरणे असून, त्यांची एकूण क्षमता २९ टीएमसी आहे. या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या वर्षी जेमतेम पाऊस झाल्याने आॅक्टोबर २०१५अखेर या धरणांत केवळ ५० टक्के साठा होता. त्यानंतर पुणे शहर व जिल्ह्यातील गावांसाठी पाण्याचे नियोजन केल्यानंतर ३० मेअखेर धरणसाठा २.८० टीएमसीवर पोहोचलेला आहे. केवळ शहरासाठी पाणी राखीव ठेवल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. दरम्यान, पुणे शहरासाठी दरमहा १ टीएमसी पाण्याची आवश्यकता असून, ते राखीव ठेवल्यास जुलैअखेरपर्यंत शहराला पुरेल एवढे असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.त्यातील जवळपास 0.३0 टीएमसी पाणी धरणसाठा म्हणून शिल्लक ठेवावा लागणार असल्याने तसेच दोन टाऊनशिपसाठीही पाणी सोडावे लागणार आहे. तर काही पाण्याचे बाष्पीभवन होईल.पालखी सोहळा जूनअखेरीस पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. हा पालखी सोहळा जिल्ह्याच्या हद्दीतून पुढे जाताना कालव्यातून पाणी सोडण्यात येते.