शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यात विद्यमान सदस्यांना नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर: खेड तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी विद्यमान सदस्यांना पराभूत करत मोठ्या संख्येने तरुण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राजगुरुनगर: खेड तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी विद्यमान सदस्यांना पराभूत करत मोठ्या संख्येने तरुण उमेदवार निवडून आले आहे. काही ग्रामपंचायतमधील आजी-माजी पदाधिकाऱ्यांना मतदारांनी घराचा रस्ता दाखविला. तीन ठिकाणी समान मते पडल्याने ‘टाय’ झाल्याने चिठ्यांनी उमेदवारांचे भवितव्य ठरले. विजयी उमेदवारांनी व सर्मथकांनी गुलाल भंडाराची उधळण करत आनंद व्यक्त केला.

तालुक्यातील एकूण ८० ग्रामपंचायतींकरिता २२३ प्रभागांसाठी शुक्रवारी (दि.१५) ४१३ जागांसाठी मतदान झाले. बहुतांश गावामध्ये विविध पक्षांचे संमिश्र पॅनेल होते. तालुक्यातील कुठल्याच गावात पूर्ण पक्षाचे पॅनेल नव्हते. विजयी उमेदवारांनी आमदार दिलीप मोहिते यांच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती.

कडूस येथे अनिकेत धायबर व संजय आरगडे यांना समान ३१२ मते पडली. पोस्टाच्या दोन मतामुळे धायबर विजयी झाले. राक्षेवाडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे खेड बाजार समिती संचालक अशोक राक्षे पाचव्यांदा विजयी झाले आहेत. वेताळे येथे ग्रामपंचायतील शिवसेनेचे विद्यमान सरपंच बंडू बोंबले फक्त एक मताने निवडून आले तर त्यांची पत्नी सविता बोंबले ३४ मतांनी विजयी झाले.

निमगाव ग्रामपंचायत मध्ये विद्यमान सदस्य व माजी सरपंच अमर शिंदे पाटील हे गावच्या इतिहासामध्ये एका प्रभागामध्ये सर्वाधिक ३०० मतांनी निवडून येण्याचा मान मिळवला. मनसेचे तालुकाध्यक्ष संदीप बाळू पवार सावरदरी ग्रामपंचायत निवडणुकीत फक्त एक मताने विजयी झाले. दावडी येथे विद्यमान पंचायत समिती राष्ट्रवादीच्या सदस्या वैशाली गव्हाणे यांचे पती माजी सरपंच संतोष गव्हाणे यांना पराभवांचा सामना करावा लागला. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या, कॉंग्रेस राज्य कार्यकारिणी सदस्या वंदना सातपुते मोठ्या मतांच्या फरकाने पराभूत झाल्या. कडूस ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य पंडित मोढवे आणि सुलभा चिपाडे यांना परभवास सामोरे जावे लागले. तर ७६७ विक्रमी सर्वाधिक मते मिळवण्याचा मान लता दत्तात्रय ढमाले यांनी मिळवला. चाकण येथील मेदनकरवाडी ग्रामपंचायतीत भाजपचे माजी सरपंच रामदास मेदनकर, त्यांच्या पत्नी सुरेखा मेदनकर, व मुलगा संकेत मेदनकर. हे तिघेही विजयी झाले. वाफगाव येथे उपसरपंच अजय भागवत पराभूत झाले. चिंचबाईवाडीच्या विद्यमान सदस्या पूनम गार्डी यांची यापूर्वी बिनविरोध निवड झाली. मात्र त्यांचे पती माजी सरपंच संतोष गार्डी यांचा निसटता पराभव झाला. कडधे येथे सदानंद ग्रामविकास पॅनेलने ९पैकी आठ जागा जिंकल्या. कॉन्ट्रॅक्टर जयसिंग भोगाडे हे खरपुडी तर सतीश नाईकरे हे कमान येथून विजयी झाले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीत दोन एकमेकाविरोधातील मतांच्या मोठा फरकाबाबत शंका उपस्थित केल्याने पुन्हा उमेदवारांना कार्यकर्ते ना बॅलेट युनिट कंट्रोल युनिटवर फेरमतमोजणी करुन शंका दूर करण्यात आली. जऊळके ब्रूदुक ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ३ मध्ये मीरा संतोष भालेराव व अर्चना लिंबाजी मेंगडे यांना १६१ असे समसमान मतदान पडले. तर चिठीद्वारे मीरा भालेराव विजयी झाल्या. धानोरे ग्रामपंचायतीत सेनेचे माजी जिल्हाप्रमुख यांचा पॅनल विजयी झाला.

चौकट

बिरदवडी ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच बाबासाहेब पवार व मोहन पवार विजयी झाले. सावरदरी ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच रेणुका शेटे पराभूत झाल्या. १३ सदस्य संख्या असलेल्या चिंबळी ग्रामपंचायत निवडणुकीत बाजार समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादीचे नेते विलास कातोरे व बाजार समिती संचालक व शिवसेनेचे नेते पांडुरंग बनकर यांच्या पॅनेलला प्रत्येकी सहा जागा मिळाल्या असून एक अपक्ष निवडून आला. गोलेगाव ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समितीचे सदस्य यांचे पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाले. वराळे माजी सरपंच बेबीताई बुट्टे पाटील पराभूत झाल्या.

चौकट

मतमोजणी दरम्यान खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी केंद्र व व गावागावात पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

फोटो ओळ: राजगुरुनगर येथील क्रीडा संकुल येथे चासकमानच्या डाव्या कालव्यावर निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.