शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

पुनर्वसनाची जखम अद्यापही भळभळतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 01:56 IST

‘आधी पुनर्वसन मग धरण,’ असे आश्वासन भामा- आसखेड धरणाच्या भूमिपूजनावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दिले होते

- शिवाजी आतकरीखेड : ‘आधी पुनर्वसन मग धरण,’ असे आश्वासन भामा- आसखेड धरणाच्या भूमिपूजनावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दिले होते. तीस वर्षांनंतरही धरणग्रस्तांची पुनर्वसनाची भळभळती जखम कायम आहे. अधिकाऱ्यांचे कागदी घोडे आणि पुढाºयांच्या धरणग्रस्तांविषयी असणाºया पुतनामावशीच्या प्रेमामुळे भामा- आसखेड धरणग्रस्त अजूनही वेठीला धरला जातोय. धरणग्रस्त तरुणाने शनिवारी घेतलेल्या जलसमाधीने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.१९८९ मध्ये भामा आसखेड धरणाचे भूमिपूजन झाले. खेड, दौंड, हवेली या तालुक्यातील सिंचनाचे नियोजन त्यात होते. काळाच्या ओघात शहरीकरणआणि औद्योगिकरण यासाठी पाणी आरक्षित होऊ लागले. परिणामस्वरूप कालवेही रद्द झाले. शेती सिंचन हा मुख्य विषय बाजूला राहिला. पाण्याचे वाटे घातले गेले. या वाटाघाटीत ज्याचे अस्तित्व पणाला लागले त्याच्याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करण्याचे पाप अधिकारी-पुढाºयांनी केलंय.१ हजार ४१४ खातेदार या धरणामुळे बाधित झाले. संकलन रजिस्टर दुरुस्त करावे, या मागणीनंतरसाधारण २५० खातेदार त्यात वाढले. मात्र, दप्तर दिरंगाईने त्यास अद्याप अंतिम स्वरूप आले नाही. ६५ टक्के पुनर्वसनासाठी रक्कम केवळ १११ खातेदारांनी भरल्यामुळे तेवढेच पुनर्वसनासाठी पात्र अशी शासकीय आकडेवारी सांगते. वास्तविक ४०३ खातेदारांनी पासष्ट टक्के रक्कम भरण्यास आम्हाला संधीच दिली नसल्याचा आरोप करीत उच्च न्यायालयात धाव घेतली.२०१६ मध्ये उच्च न्यायालयाने पात्रता यादी तपासण्याचे आदेश दिले. त्यालाही दोन वर्षे झाली. यात अधिक खोलवर पाहता १ हजार ४१४ धरणग्रस्तांपैकी ४०३ खातेदारांनी पुनर्वसनासाठी प्रयत्न चालवले आहेत. ९०० धरणग्रस्तांचा विषय मात्र अद्यापही अंधारात आहे.>अवहेलना : खोट्या आश्वासनांची खैरातअज्ञान, संघटन नाही, सरकारी पातळीवरील अवहेलना, खोटी आश्वासने, वेळकाढूपणा आणि स्वार्थी राजकारणी यांनी धरणग्रस्तांना छळलंय. तीस-तीस वर्षे वाट पाहावी लागणार असेल तर संयम तरी ठेवणार कसा? याचाच परिपाक म्हणून तरुण धरणग्रस्ताने जलसमाधी घेतली. पुनर्वसन होत नसल्याचा पहिला बळी खेड तालुक्यात गेला आहे. चासकमान, कळमोडी, भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तरुणाच्या जलसमाधीने पुन्हा ऐरणीवर आला आहे.पात्र बाधित खातेदारांना त्यांच्या पसंतीची जमीन देऊन पुनर्वसन करा, असे न्यायालयाचे आदेश आहेत. हा आदेश न जुमानता पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी पाणी देण्यासाठी काम सुरू आहे. तीस वर्षांनंतरही पुनर्वसन होत नाही, हे दुर्दैव आहे. इच्छाशक्ती नसल्यामुळे शासन हे करीत असल्याचा आरोप धरणग्रस्त करीत आहे. आमचे पुनर्वसन खेड तालुक्यातच करावे, एकरी पन्नास लाख रुपये भरपाई द्यावी, महामार्गाला जे संपादन होते, तसा मोबदला त्वरित द्यावा, असे काही तोडगे धरणग्रस्त सुचवीत आहेत. यातून मार्ग निघू शकतो.