शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी-पालकांचे भरपावसात हाल

By admin | Updated: June 28, 2017 04:26 IST

विविध कामांसाठी शिवाजीनगर येथील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विविध कामांसाठी शिवाजीनगर येथील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधांअभावी भरपावसात मनस्ताप सहन करावा लागत आहे. गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, गुणपत्रिकेतील दुरुस्ती यांसह विविध कामांसाठी केवळ एकच काउंटर ठेवण्यात आल्याने दोन-दोन तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे येथील कर्मचारी, सुरक्षारक्षकांबरोबर विद्यार्थी व पालकांचा वाद होताना दिसत आहे.राज्य मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. मंडळाकडून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, गुणपत्रिकेतील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी सुविधा दिली जाते. मंडळाच्या विभागीय कार्यालयांमधून ही प्रक्रिया केली जाते. पुण्यात शिवाजीनगर येथे विभागीय कार्यालय असून गेल्या काही दिवसांपासून येथे गर्दी होत आहे. सर्व कामांसाठी मंडळाकडून केवळ एकाच काउंटरवर सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्ज व शुल्क भरण्यासाठी या काउंटरवर मोठी गर्दी होत असून विद्यार्थी व पालकांना दोन-तीन तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यातच सध्या अधूनमधून पाऊस पडत असल्याने त्यांना पावसात भिजण्याशिवाय पर्याय नाही. मंडळाकडून त्यासाठीही काहीही व्यवस्था केलेली नाही. रांग धीम्या गतीने पुढे सरकत असल्याने विद्यार्थी, पालकांना शुक्रवारी मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे तेथील कर्मचारी व सुरक्षारक्षकांसोबत त्यांची वादावादीही झाली. पण एकच काउंटर असल्याने कर्मचाऱ्यांकडूनही काहीही केले जात नव्हते. तीन-तीन तास रांगेत उभे राहूनही अर्ज भरले जात नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. एवढे शुल्क घेऊनही चांगली सुविधा दिली जात नाही, अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.