शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

एसटी अभावी प्रवाशांचे हाल

By admin | Updated: August 13, 2014 04:46 IST

अपु-या एस.टी. बस संख्येमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. राजगुरुनगर बसस्थानकातून खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या एस.टी. बस भरगच्च भरून जातात.

दावडी : अपु-या एस.टी. बस संख्येमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. राजगुरुनगर बसस्थानकातून खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या एस.टी. बस भरगच्च भरून जातात. त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध यांचे हाल सुरूआहेत. तातडीने आगार प्रशासनाने दखल घेऊन जादा गाड्या सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.ग्रामीण भागात जाणारी एस.टी. बससेवा तोकडी पडत आहे. दावडी, वाफगाव, गुळाणी, खरपुड, चिखलगाव, येणवे, आंबोली, डेहणे, वाडा, पाईट, कडूस, शेलपिंंपळगाव या गावातील अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी तालुक्याच्या गावी येतात. तसेच कामानिमित्त येणारे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध यांची संख्या मोठी आहे. स्थानकातून सुटणाऱ्या एस.टी. बसची संख्या कमी आहे. एस.टी.चालकाला चालक केबीनमध्ये प्रवाशी बसल्याने एस.टी. बस चालवण्यात अडथळे येतात. विशेषत: एस.टी. बसमध्ये जागा मिळविण्यासाठी महिला व मुलींची मोठी कुचंबणा होते. गर्दीचा फायदा घेऊन चोरटे खिशातील पाकिटे व महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवतात. त्यामुळे प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो.पासधारक विद्यार्थ्यांना एस. टी. बसमध्ये जागा मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना खासगी वाहनातून ये-जा करावी लागत आहे. ग्रामीण भागात बसेसची संख्या वाढवावी अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)