शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नाले वळविण्यास बसणार लगाम

By admin | Updated: May 23, 2014 04:51 IST

अनधिकृत बांधकामांसाठी मनमानी पद्धतीने नाले वळविण्यास आता लगाम बसणार आहे.

पुणे : अनधिकृत बांधकामांसाठी मनमानी पद्धतीने नाले वळविण्यास आता लगाम बसणार आहे. शहरातील नाल्यांच्या सध्याच्या स्थितीसंदर्भात प्रायमुव्ह संस्थेने अहवाल तयार केला आहे. हा अहवाल अंतिम असल्याने यापुढे खासगी जागा मालकांना नाला वळविण्यासाठी प्रशासनाकडून देण्यात येणार्‍या नियंत्रण नियमावलीतील ११ (ब)ची असलेली तरतूद रद्द करण्यात यावी, तसेच जुन्या व नवीन हद्दीच्या विकास आराखड्यात अहवालाचा अंतर्भाव करावा, या प्रस्तावास नुकतीच मुख्य सभेत मान्यता देण्यात आली. नगरसेवक अजय तायडे आणि प्रकाश ढोरे यांनी शहर सुधारणा समितीत ठेवलेल्या या प्रस्तावास समितीने मान्यता दिल्यानंतर मुख्य सभेनेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. शहरातील नाल्यांसंदर्भातील सद्य:स्थितीचा अहवाल प्रायमुव्ह संस्थेने तयार केला असून महापालिका प्रशासनाने स्वीकारला आहे. मात्र, हा अहवाल अंतिम करण्यापूर्वी शहरातील नाल्यांची दिशा बदलण्याचे अधिकार विकास नियंत्रण नियमावलीमधील ११ (ब)नुसार प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्याचा वापर करून जागा मालकांच्या मागणीनुसार, अनेक ठिकाणी नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह बदलण्यात आलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूरजन्य स्थितीही निर्माण झालेली आहे. हे प्रकार भविष्यात रोखण्यासाठी नाल्यात बदल करण्यासाठी असलेली तरतूद रद्द करण्याचे ठरावात नमूद करण्यात आले होते. तसेच, या रद्द झालेल्या तरतुदीत बदल करून ३७ (१) च्या कारवाईनुसार, प्रायमुव्हचा अहवाल जुन्या आणि नवीन विकास आराखड्यात समाविष्ट करावा, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. शहरात पाच प्रमुख नाले असून, सुमारे १५०च्या वर छोटे-मोठे नाले आहेत. दरम्यान, हा अहवाल विकास आराखड्यात समाविष्ट करण्याची कारवाई पूर्ण करेपर्यंत नाला बदलांच्या प्रस्तावास स्थगिती देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.(प्रतिनिधी)