शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाकडून वाचन चळवळ

By admin | Updated: June 27, 2017 08:04 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळामार्फत ज्ञानविज्ञान वाचन चळवळ सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळामार्फत ज्ञानविज्ञान वाचन चळवळ सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत ९२ ग्रंथ अन्वेषकांची निवड करण्यात आली असून, ते पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यातील केंद्रामध्ये वाचन चळवळ रुजविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.बहि:शाल विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या वाचन चळवळीमध्ये काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी विद्यापीठामध्ये तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. निवडक ग्रंथातील आशयाचे विश्लेषण करणारी मांडणी करणे आणि त्यावर चर्चा घडवून आणण्याचे काम या कार्यकर्त्यांकडून केले जाणार आहे. या चळवळीतील कार्यकर्त्यांना ग्रंथ अन्वेषक म्हणून संबोधले जाणार आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांना बहि:शाल शिक्षण मंडळाने पुरवलेल्या ग्रंथाच्या यादीतील एका ग्रंथाची निवड करून त्याबाबतचे सादरीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार या चळवळीत काम करू इच्छिणाऱ्या १२० जणांनी प्रत्येक एक याप्रमाणे १२० ग्रंथ निवडून चळवळीत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी केली होती. तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार त्यापैकी ९३ ग्रंथ अन्वेषकांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती बहि:शाल शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. नवनाथ तुपे यांनी दिली. पुणे, नगर, नाशिक या जिल्ह्यांतील महाविद्यालये, सामाजिक संस्था, सार्वजनिक वाचनालये, ज्येष्ठ नागरिक संघ, मंडळे इत्यादींच्या माध्यमातून ग्रंथावर चर्चा घडवून आणणे, हा या वाचन चळवळीचा मुख्य उद्देश आहे. बहि:शाल शिक्षण मंडळाच्या केंद्रावर तीन दिवस एका गं्रथावर एक तास व्याख्यान आणि चर्चा असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. ग्रंथ अन्वेषकांच्या या कार्यक्रमातून विद्यार्थी व नागरिकांमध्ये वाचनाची आवड वाढविण्याचे काम केले जाणार आहे.