शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोची सुनावणी पुन्हा लांबणीवर

By admin | Updated: August 13, 2016 05:28 IST

नदीपात्रातून मार्ग जात असल्याच्याविरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता ही सुनावणी २२ सप्टेंबरला होणार आहे.

पुणे : नदीपात्रातून मार्ग जात असल्याच्याविरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता ही सुनावणी २२ सप्टेंबरला होणार आहे.पुणे मेट्रोच्या मार्गापैकी काही भाग नदीपात्रातून जात असल्याबद्दल एनजीडीकडे दाद मागण्यात आली आहे. राज्यसभेच्या खासदार अनु आगा यांच्यासह काही पर्यावरणप्रेमींचा त्यात समावेश आहे. नदीपात्राला अडथळा निर्माण होईल, तसेच त्यामुळे पर्यावरणाची हानी होईल, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. शुक्रवारी त्याची सुनावणी झाली. त्यामध्ये, महापालिकेने काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले. परंतु, त्यावर चर्चा करण्यापेक्षा याचिकेतील मागण्यांवर चर्चा होणे अधिक योग्य ठरेल, असे मत व्यक्त करून एनजीटीने ही सुनावणी २२ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. खंडुजीबाबा चौकापासून ते महापालिकेच्या मुख्य इमारतीपर्यंतचा सुमारे १.७ किमीचा मार्ग नदीपात्रातून दाखवण्यात आला आहे. या मागार्मुळे नदीच्या प्रवाहाला धोका निर्माण होण्याची भीती याचिकाकर्त्यांनी केली आहे, तसेच पुराचा धोकाही वाढण्याचा दावा त्यांनी केला आहे.