शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

कुरकुरे देऊन चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लोणी काळभोर : चार अल्पवयीन मुलीस कुरकुरे देऊन खोलीत नेवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी काळभोर : चार अल्पवयीन मुलीस कुरकुरे देऊन खोलीत नेवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उरूळी देवाची दूरक्षेत्राचे हद्दीत घडली आहे. आरोपी नराधमाने तिच्या ओठाला व गालाला चावून तिला गंभीर जखमी केले आहे.

मनुकुमार मनोज सिंग (वय २३, रा. मंतरवाडी, ता. हवेली, मूळ रा. बिहार) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी ही उस्मानाबाद जिल्ह्यातील असून तिचे वडील ड्रायव्हर म्हणून काम करतात. सुमारे २ वर्षांपासून ती आई, वडील व लहान भावासह या परिसरात राहत आहे. शनिवारी (दि.३) सकाळी ८.३० च्या सुमारास तिचे वडील कामावर गेले. दुपारी ३ च्या सुमारास आई घरात भांडी घासत होती.

त्यावेळी पीडित मुलगी आपल्या एक वर्ष वयाच्या भावासमवेत घराबाहेर पोर्चमध्ये खेळत होती. काही वेळानंतर आईने तिला आवाज दिला परंतु ती पोर्चमध्ये दिसली नाही म्हणून तिचा इकडे तिकडे शोध घेतला. तेव्हा इमारतीतील काही लोक बाहेर आले. तेव्हा मुलगी वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर येताना दिसली. आईने तिला घरात नेले व काय झाले विचारले असता तिने सांगितले की, मला वरच्या मनुने कुरकुरे देऊन त्याच्या खोलीत नेले. माझ्या ओठाला व गालाला चावला. यानंतर तिने संपूर्ण घटनाक्रम आईला सांगितला. तिचे वडील घरी आल्यावर तिच्या आईने घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान पीडित मुलगी खूप दुखतंय असे म्हणून रडू लागली. तिच्या शरीराची आईने पाहणी केली. तिचे ओठ सुजले होते व त्यातून रक्त येत होते. गालाला चावलेल्या खुणा दिसत होत्या. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. यानंतर आईने पोलिसांत तक्रार केली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यास न्यायालयाने ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.