पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून अजूनही प्रयत्न करता आले तर पहा, अशी विनंती केली आहे़ आता रात्री उशिरा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना भेटून त्यांनाही विनंती करणार आहे़ जर तरीही काही झाले नाही तर उद्या (दि. २६) कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले़ भाजपने आठवले यांना आपल्या कोट्यातून खासदारकी दिली असली तरी बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे, असे आव्हान केले होते़ त्यामुळे शिवसेनेबरोबर जावे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे़ मात्र, रिपाइंने मागितलेल्या पुण्यातील कॅन्टोंमेंट आणि वडगाव शेरी या दोन्ही जागा शिवसेनेकडे असून, ते त्या जागा देणार का, हा प्रश्न आहे़ (प्रतिनिधी)
रामदास आठवले आज घेणार निर्णय
By admin | Updated: September 26, 2014 05:31 IST