शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गणोशभक्तांची सुरक्षा रामभरोसे

By admin | Updated: September 3, 2014 23:49 IST

खेडच्या पूर्व भागात गणोश विसर्जनाच्या ठिकाणी प्रशासनाने खबरदारी म्हणून कुठलीही उपाययोजना आखलेली नाही.

शेलपिंपळगाव : खेडच्या पूर्व भागात गणोश विसर्जनाच्या ठिकाणी प्रशासनाने खबरदारी म्हणून कुठलीही उपाययोजना आखलेली नाही. त्यामुळे भीमा-भामा नदीवर ‘श्रीं’ना भावपूर्ण निरोप देणा:या सर्व गणोशभक्तांची सुरक्षा रामभरोसे आहे. 
खेडच्या पूर्व भागातील गावांमध्ये गणोशोत्सवाची धूम मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. हा उत्सव चैतन्यपूर्ण वातावरणात सांगतेकडे वाटचाल करीत आहे. या वर्षी या भागात गेल्या वर्षीच्या तुलनेत गणोश मंडळांमध्ये वाढ झाली आहे.
या पाश्र्वभूमीवर, प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवणो अत्यंत गरजेचे आहे. शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे भीमा व भामा या दोन नद्यांचा संगम होऊन ती भीमा-भामा या नावाने दक्षिण वाहिनी म्हणून पुढे प्रवाहित होते. या संगमाच्या शेजारी गणपती विसर्जनाचे ठिकाण आहे. पूर्व भागातील बहुतांशी मोठमोठी सार्वजनिक गणोश मंडळे याच पवित्र ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्यास पसंती देत असतात. चालू वर्षी अनेक ठिकाणी लहान मुलांनीही बालगणरायाची स्थापना केलेली आहे. येत्या सोमवारी (दि. 8) शेलपिंपळगाव येथील भीमा-भामा तीरावर सर्वच गणोश मंडळांच्या बाप्पाचे विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुकांमध्ये हजारो भाविक-भक्त सहभागी झालेले असतात. 
यंदा मुबलक होत असलेल्या पावसाने भीमा-भामा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला वेग आहे. या पाश्र्वभूमीवर, गणोश विसर्जनाच्या वेळी या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.   (वार्ताहर)
 
भीमा-भामा नदीवर बाल गणोशभक्तांची संख्या मोठी
खेडच्या पूर्व भागातील शेलपिंपळगाव, शेलगाव, दौंडकरवाडी, वडगाव-घेनंद, कोयाळी-भानोबाची, मोहितेवाडी, नवीनगाव, दत्तवाडी आदी गावांच्या सार्वजनिक गणोश मंडळांच्या बाप्पाचे विसर्जन भीमा-भामा तीरावर केले जाते. तसेच, बाहेरील गावातील, विद्यालयातील व घरगुती बाप्पालाही याच ठिकाणाहून निरोप दिला जातो. गणोश विसर्जनाला बालगणोशभक्तांची मोठी गर्दी असते. याचा विचार करता, सुरक्षा असणो अत्यंत आवश्यक आहे.  
 
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गणपती विसर्जनासाठी प्रशासनातर्फे  चोख सुरक्षाव्यवस्था ठेवणो आवश्यक आहे. मात्र, अनेक ठिकाणच्या विसर्जन घाटावर कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी बालगणोशभक्तांसह ज्येष्ठांच्याही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. याविषयी ‘लोकमत’ने जिल्ह्यातील विसर्जन घाटांवरील तयारीचा घेतलेला हा आढावा.