शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगर नगरपरिषद भाजपाकडे

By admin | Updated: April 21, 2017 06:01 IST

दोन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या मदतीने अपक्षांनी राजगुरुनगर नगर परिषदेच्या सत्तेच्या चाव्या हातात घेतल्या होत्या; मात्र अपक्षांना गळाला लावत अखेर भाजपाने

दावडी : दोन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या मदतीने अपक्षांनी राजगुरुनगर नगर परिषदेच्या सत्तेच्या चाव्या हातात घेतल्या होत्या; मात्र अपक्षांना गळाला लावत अखेर भाजपाने नगर परिषद आपल्या ताब्यात घेतली आहे. गुरुवारी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे संदीप सांडभोर हे बहुमताने निवडून आले. अपक्ष नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे यांनीही दोन दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश करीत आपली खुर्ची वाचवली आहे. शिवसेनेच्या उपनगराध्यक्षा सारिका घुमटकर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेसाठी ही निवडणूक झाली.दोन वर्षांपूर्वी राजगुरुनगर नगर परिषदेची निवडणूक झाली. यात अपक्षांनी सर्वाधिक १० जागा मिळविल्या. दुसऱ्या क्रमांकावर भाजपा राहून त्यांनी सात, तर शिवसेनेला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, एक अपक्ष फुटून भाजपाच्या गळाला लागल्याने त्यांचे संख्याबळ आठ झाले. त्यामुळे अपक्षांनी शिवसेनला उपनगराध्यक्षपद देत दोन सदस्यांच्या मतदतीने नगर परिषद ताब्यात घेतली. उपनगराध्यक्षपद हे सव्वा वर्षासाठी ठरले होते. त्यानुसार शिवसेनेच्या उपनगराध्यक्षा सारिका घुमटकर यांनी राजीनामा दिला आणि येथील राजकारण फिरले. भाजपाने टाकलेल्या गळाला अपक्ष लागले. ९ अपक्षांपैैकी दोन वगळता सात जणांनी भाजपात प्रवेश केला. यात अपक्ष संदीप सांडभोर यांचाही समावेश होता. गुरुवारी झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदीप सांडभोर व शिवसेनेचे शंकर राक्षे यांनी उमेदवारी अर्ज भरले. निवडणूक मतदान प्रक्रिया हात वर करून घेण्यात आली. यात भाजपाचे संदीप सांडभोर यांना १४ मते, तर शिवसेनेचे शंकर राक्षे यांना शिवसेनेची दोन उरलेल्या अपक्षांची दोन अशी ४ मते पडली.