शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राजगौरीची बुद्धीमत्ता भल्याभल्यांना थक्क करणारी

By admin | Updated: May 10, 2017 03:09 IST

मी १२ वर्षाच्या राजगौरीला परीक्षा हॉलमध्ये सोडण्यासाठी गेलो, तेव्हा १८ वर्षांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकजण परीक्षेला होते.

महेंद्र कांबळे। लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : मी १२ वर्षाच्या राजगौरीला परीक्षा हॉलमध्ये सोडण्यासाठी गेलो, तेव्हा १८ वर्षांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकजण परीक्षेला होते. अनेकांना मीच परीक्षार्थी आहे, असे वाटले. ज्या वेळी राजगौरी परीक्षा देणार आहे, असे समजले,तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. निकाल आला, त्या वेळी १६२ अंक तिला मिळाले. बुद्ध्यांक चाचणीत जागतिक स्तरावर तिने नाव मिळवले. कष्ट करण्याची तिची तयारी भल्याभल्यांना लाजवेल अशी आहे, अशा शब्दांत आइनस्टाइनपेक्षा जिचा बुद्धयांक (आय.क्यू) जास्त आहे, अशा जागतिक कीर्तीच्या राजगौरीचे वडील डॉ. सुरजकुमार पवार यांनी सांगितले.पवार यांनी इंग्लडहून खास ‘लोकमत’शी संवाद साधला. इंग्लंडला जाण्यापूर्वी पवार कुटुंब बारामतीमध्ये वास्तव्यास होते. २००६ मध्ये डॉक्टरेट (पीएच.डी) साठी इंग्लडला जाण्याची त्यांना संधी मिळाली. युनिव्हर्सिटी आॅफ मॅन्चेस्टरमध्ये पीएच.डी होताच तिथे संशोधक म्हणून काम मिळाल्याने ते इंग्लंडमध्येच स्थायिक झाले. दरम्यानच्या काळात बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान बाल विकास मंदिर शाळेत राजगौरीला एक वर्ष शिक्षण घेण्यास मिळाले. त्यानंतर इंग्लंडमधील प्रसिद्ध ‘आॅल्टिंगम ग्रामर स्कूल’मध्ये तिला प्रवेश मिळाला. तिच्यामध्ये दैनंदिन वाचनाची व अभ्यासाची सवय असल्याने आयक्यू टेस्ट देण्याचा निर्णय तिच्या आईवडिलांनी घेतला. साधारणत: १२० ते १४० अंक मिळविणाऱ्यांना ‘जिनिअस’ म्हणून संबोधले जाते. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन, प्रा. स्टिफन हॉकिंग यांना बुद्ध्यांकाचे १६० अंक आहेत. मात्र, राजगौरीने कमाल १६२ अंक मिळविले. या यशाबद्दल ‘मेन्सा’ या प्रतिष्ठित ‘हाय आय क्यू’ सोसायटीचे सदस्यत्वही तिला मिळाले आहे.