शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

त्याच जागी पुतळा उभारा

By admin | Updated: February 12, 2015 02:26 IST

बारामतीकरांचे आकर्षण ठरलेल्या शेतकरी पुतळाचा परिसर बळकावण्यासाठी रातोरात उद्ध्वस्त करण्यात आला. ‘लोकमत’ने याचे वृत्त

बारामती : बारामतीकरांचे आकर्षण ठरलेल्या शेतकरी पुतळाचा परिसर बळकावण्यासाठी रातोरात उद्ध्वस्त करण्यात आला. ‘लोकमत’ने याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आज त्याचे पडसाद उमटले. ज्यांनी पुतळा उद्ध्वस्त केला, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबर त्याच जागेवर शेतकरी पुतळा तातडीने उभारण्यात यावा, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली. नगरपालिकेच्या जागेवर १९७१ साली लायन्स क्लबने शेतकरी उद्यान उभारले होते. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रतिक म्हणून उसाची मोळी घेऊन चाललेला पुतळा उभारण्यात आला होता.या संदर्भात आज शेतकरी कृती समितीचे नेते रंजनकाका तावरे, विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील, शिवसंग्रामचे महेंद्र तावरे, भाजपाचे कुलभूषण कोकरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे किशोर मासाळ, सामाजिक कार्यकर्ते शाकीर बागवान, भाजप अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष आसिफ खान, शिवसेनेचे उपप्रमुख अ‍ॅड. राजेंद्र काळे आदींनी मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना पुतळा तोडल्या प्रकरणी जाब विचारला. या प्रकरणी रितसर संबंधित समाजकंटकावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच, त्याच ठिकाणी नवीन पुतळा उभारावा, नगरपालिकेने पुतळा न उभारल्यास सर्व पक्षांच्या वतीने नगरपालिकेस शेतकरी पुतळा भेट देण्यात येणार आहे. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना रंजन तावरे म्हणाले, शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बारामतीतच शेतकरी पुतळा तोडला जात आहे. ही बाब निषेधार्ह आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई झाली पाहिजे. विरोधी नगरसेवक सुनिल सस्ते यांनी सांगितले की, पुतळ्याची पुर्नस्थापना नगरपालिकेने न केल्यास लोकवर्गणीतून त्याच ठिकाणी पुतळा बसविण्यात येईल. भाजपचे असिफ खान यांनी त्या परिसरात असलेल्या संस्थेला पुतळ्याची जागा बळकविण्यासाठी पुतळा पाडला आहे का, असा जाब मुख्याधिकाऱ्यांना विचारला. भाजपचे शहराध्यक्ष नितिन भामे यांनी यापूर्वी पाण्याची टाकी पाडून जागा बळकावली आहे. नगरपालिकेने त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. तर रासपचे किशोर मासाळ यांनी पुतळ्याच्या बाबत तातडीने पुन्हा निर्णय न घेतल्यास अधिकाऱ्यांना नगरपालिकेत काम करण्यापासून रोखले जाईल. तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.पुतळा पाडणे आणि उभारणे हे नगरसेवकांना विचारात न घेता कसे घडले, याचा जाब विचारण्यात आला. त्यासाठी पालिकेत ठराव केला आहे का, अशी विचारणा यावेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)